तीन दिवसाची पोलीस कोठडी
संदीप कांबळे , कामठी १९ : दहा महिन्यापूर्वी कामठी- नागपूर मार्गावर खैरी शिवारात ट्रॅव्हल बस मधून गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीस जुनी कामठी पोलिसांनी बिहार राज्यातून अटक केली असून तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळवली आहे जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर –जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर खैर शिवारात दहा महिन्यापूर्वी दिनांक 27 सप्टेंबर 2024 ला ट्रॅव्हल्स बस मधून 26 किलो 158 ग्राम गांजाची तस्करी करीत असताना ट्रॅव्हल्स बस चालकाबरोबर झालेल्या भांडणामुळे आरोपी कुणालकिशोर सिंह मदनमोहन सिंह वय 40 वर्ष राहणार करणपुरा दुर्गावती जिल्हा कैमुद बिहारराज्य हा ट्रॅव्हल्स बस मध्ये गांजा सोडून प्रसार झाला होता माहिती नागपूर शहर गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक राजेश लोही यांना मिळाली असता त्यांनी सदर ट्रॅव्हल बस खैरी शिवारात थांबवून तपासणी करत असताना आरोपीने 26 किलो 128 ग्राम गांजा गाडी सोडून पसार झाला होता त्याची किंमत पाच लाख 22 हजार 560 रुपये पोलिसांनी जप्त केला जुनी कामठी पोलीस स्टेशनला 8 (क), 20 (ब) एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता ट्रॅव्हल्स बस मधून जुनी कामठी पोलिसांना आरोपीच्या मिळालेला आधार कार्ड वरून गेल्या दहा महिन्यापासून पोलीस शोध घेत होते परंतु सतत पोलिसांना तुरा देऊन पसार होत होता जुनी कामठी पोलिसांनी दिनांक 16 ऑगस्ट 2025 ला करणपुरा बिहार राज्यातून आरोपीला अटक करून जुनी कामठी पोलीस ठाण्यात आणून त्याला कामठी येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिवसाची 3 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे त्यामुळे आरोपी जवळून अजून काही मादक पदार्थ विषयी गुन्हे उघडकिस येणार असल्याचे जुने कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांनी सांगितले आहे वरील कारवाई पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांचे मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमले, सहायक पोलीस निरीक्षक मनीश हीवरकर, हेड कॉन्स्टेबल रवींद्र गावंडे ,प्रफुल्ल तागडे यांच्या पथकाने केली




