spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रुपला मंगळागौरी स्पर्धेत प्रथम क्रमांक

 

नागपूर १९ : सीताबर्डी येथील माहेश्वरी सभागृहात आयोजित “प्रेझेंट श्रावण क्वीन 2025” या कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रुप, सौभाग्य नगर, नागपूर यांनी मंगळागौरी कॉम्पिटिशनमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

या भव्य कार्यक्रमात सोलो डान्स, ग्रुप डान्स, राधा-कृष्ण, मंगळागौर व श्रावण क्वीन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात होळकर ग्रुपच्या संजीवनी घुरडे, अश्विनी उरकुडे, संगीता खुजे, अर्चना बुधे, तेजस्विनी शेखर, वैशाली बीटे, काजल चावटकर, पूजा खुजे, कामिनी तवले व दीक्षा चावटकर यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे आयोजन संगीता गावडे यांनी केले होते. या सोहळ्याला ‘तुफान एक नशा’ चित्रपटाचे नायक प्रेम धीराल, निर्माता धनराज हरडे व सामाजिक कार्यकर्ते शाम थोरात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.

Popular Articles