spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना मातृशोक

 

नागपूर १९ : राज्याचे माजी मंत्री व काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलाबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या. नागपूर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कमलाबाई यांच्या निधनाने वडेट्टीवार कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी ३ वाजता नागपूर येथे अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. नातेवाईक, मित्रपरिवार, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहतील.

कमलाबाई वडेट्टीवार यांच्या निधनाची बातमी समजताच काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला असून राज्यभरातील कार्यकर्त्यांकडूनही श्रद्धांजली वाहिली जात आहे.

Popular Articles