spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

 संजय राऊतांचा घणाघात : ५० हजार कोटींचा भूखंड घोटाळा शिंदे–शिरसाटांच्या खिशात, १० हजार कोटी दिल्लीतल्या ‘बॉस’कडे!

 

मुंबई १९ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांच्यावर थेट ५० हजार कोटींच्या भूखंड घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आहेत.

२० हजार कोटी शिंदे–शिरसाटांच्या खिशात
राऊतांच्या म्हणण्यानुसार, वनखात्याच्या मालकीची तब्बल ५ हजार एकर जमीन एका बिवलकर नावाच्या व्यक्तीला बिनबोभाट देण्यात आली. या व्यवहारातून २० हजार कोटी रुपयांचा मलिदा शिंदे–शिरसाटांना मिळाला तर १० हजार कोटी थेट दिल्लीत पोहोचले, असा दावा राऊतांनी केला.

शहांना पत्र, दिल्लीवर थेट बोट
या घोटाळ्याला दिल्लीतून संरक्षण मिळत असल्याचे राऊतांनी सांगत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना चौकशी व शिंदे–शिरसाटांना बडतर्फ करण्याची मागणी करणारे पत्र लिहिल्याचेही त्यांनी जाहीर केले. “शिंदेंचे खरे बॉस दिल्लीमध्ये आहेत,” असा टोलाही त्यांनी लगावला.

पत्रकारांनी विषय धरून ठेवावा
“अंतुले यांचे पद पत्रकारांनीच घालवले होते. तसेच पत्रकारांनी हा विषय चालवत ठेवावा. हजारो प्रकल्पग्रस्तांना जमीन मिळत नाही, पण ५ हजार एकर जमीन एका व्यक्तीला देण्यात आली. शिंदे–शिरसाटांनी संगनमताने हा निर्णय घेतला,” असे राऊत म्हणाले.

शहांच्या आशीर्वादाने संरक्षण
“भ्रष्टाचार्यांना वाचवण्याचे सरकार महाराष्ट्रात शहांच्या आशीर्वादाने चालते आहे. गृहखाते भाजपकडे असल्यानेच घोटाळेबाजांना संरक्षण मिळत आहे,” असा घणाघात करत राऊतांनी फडणवीसांनाही सवाल केला की, सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष सही करण्यास नकार दिल्यामुळे का बदलण्यात आले?

Popular Articles