spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कावड यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात; १५ ते २० जखमी

 

भीमनगर चौकात ट्रॅक्टरचा ताबा सुटला, विजेच्या खांबाला धडक, वीजपुरवठा खंडित

अकोला १९ :  शहरातील डाबकी रोडवरून गांधीग्रामकडे जात असलेल्या कावड यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा भीमनगर चौकात ताबा सुटून अपघात झाला. या अपघातात सुमारे १५ ते २० कावड यात्रेकरू जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गंभीर जखमीत तिघांची प्रकृती चिंताजनक
अपघातात काही जखमींना हात, पाय तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल केले असतानाच, तीन जखमींना गंभीर प्रकृतीमुळे खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.

पोलिसांनी तत्परतेने केले घटनास्थळी नियंत्रण
अपघातानंतर परिसरात गोंधळ निर्माण झाला. डाबकी रोड पोलिस ठाण्याचे प्रभारी धर्मा सोनुने आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचून त्वरित परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

विजेच्या खांबाला धडक; विजेचा पुरवठा खंडित
अपघातात ट्रॅक्टर महावितरणच्या विजेच्या खांबाला धडकला असून, यामुळे परिसरातील विजेचा पुरवठा खंडित झाला आहे. तसेच, अपघातामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका दुचाकीला देखील नुकसान झाले आहे. पोलिस अधिक तपास करत असून, जखमींचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

Popular Articles