आमरदिप बडगे, तिरोडा २० : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद कार्यालय गोंदिया व तिरोडा तालुका क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने तिरोडा तालुकास्तरीय बॅटबिंटन क्रीडा स्पर्धा चे आयोजन तालुका क्रीडा संकुल,तिरोडा येथे दिनांक १८ ते १९ ऑगस्ट २०२५ रोजी घेण्यात आली होती या स्पर्धेत वयोगट १४,१७,१९ मध्ये तिरोडा तालुक्यातील १४ शाळांनी सहभाग घेतला यात १४५ मुला मुलींचा समावेश होता. या स्पर्धेला पंच म्हणून जवाहरलाल बोपचे,हेमंतकुमार पारधी, श्रीकांत लांजेवार, .आकाश शहारे .अतुल बिनझाडे यांनी जबाबदारी पार पाडली.
स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचे निवड गोंदिया येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेकरिता करण्यात आली.
या स्पर्धेला प्रामुख्याने उपस्थित ओमकांता रंगारी तालुका क्रीडा अधिकारी तिरोडा, .अमन नंदेश्वर तालुका क्रीडा संयोजक तिरोडा, क्रीडाशिक्षक .शैलेश बघेले,.चंद्रप्रकाश प्रजापती,मुकेश शेंडे,निखिल शेंडे,इतर शिक्षकवृंद स्पर्धेला प्रामुख्याने उपस्थित होते
तालुकास्तरीय बॅटबिंटन क्रीडा स्पर्धा २०२५ संपन्न









