समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे कामठी पोलिसांचा रक्षाबंधन

0
141

कामठी २१ : येथील समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थिनी व महिला प्राध्यापकांनी कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत ५२ पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून पोलिसांच्या कार्यप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी सहायक पोलीस आयुक्त डॉ अभिजीत पाटील, गुन्हे शाखा नागपूर शहर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे, पोलिस स्टेशन नवीन कामठी नागपूर शहर , पोलीस उपनिरीक्षक संदीप भिताडे , पोलीस उपनिरीक्षक सृष्टी कदम हे प्रामुख्याने उपस्थित होते. समाजकार्य महाविद्यालयातील प्रा. उज्ज्वला सुखदेवे, डॉ. मनीष मुडे, प्रा. आवेशखरणी शेख यांच्या नेतृत्वात दीपमाला शर्मा,दयावंती शेंडे, प्रतीक्षा हिवरकर, नेहा हिवरकर, जयश्री घोडे,तृप्ती गडे ,रुतिका गडे, ब्रम्हवाणी , सानिया खोके ,जुली वराडे,चैतन्या वाघमारे या विद्यार्थिनींनी पोलिसांना राखी बांधली.
या रक्षाबंधन कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थिनी सामील झाल्या होत्या. या प्रसंगी पोलीस हवालदार दीप्ती मोटघरे यांचे विशेष सहकार्य लाभले.प्रस्तुत रक्षाबंधन कार्यक्रमात महिला पोलीस कर्मचारीसुद्धा मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या.