कामठी ता प्र २१ :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी रेल्वे स्टेशन वर ज्ञानेश्वरी एक्सप्रेस ने राजनांदगाव रेल्वे स्ट्रेशन हुन कामठी पर्यंत प्रवास करून कामठी रेल्वे स्टेशन वर काल दुपारी 4 वाजता उतरले असता कामठी रेल्वे स्टेशन ओलांडले मात्र नातेवाईकांच्या घरी पोहोचले नसल्याने घरमंडळींनी चिंता व्यक्त करीत सर्वत्र शोध घेतला मात्र कुठेही थांगपत्ता लागला नसल्याने या तरुणाच्या शोधार्थ नातेवाईकात चिंतेचे वातावरण निर्मान नको त्या नकारात्मक चर्चेला पेव फूटत आहे तर काल पासून बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव वसीम अकरम ईशान खान वय 33 वर्षे रा डोंगरगाव जिल्हा राजनांदगाव राज्य छत्तीसगढ असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर बेपत्ता झालेला तरुण हा मोठ्या भावाच्या मित्राच्या सासरगावी असलेल्या कामठी शहरातील गोयल टॉकीज चौकात जायला 19 ऑगस्ट ला ज्ञानेश्वरी एक्सप्रेस ने प्रवास करून कामठी ला पोहोचले ,रेल्वे स्टेशन ओलांडून कामठी बस स्टॉप मार्गाकडे वळल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसुन आले मात्र नातेवाईकांकडे न पोहोचल्याने घरमंडळी चिंतेत आहे.तसेच सदर बेपत्ता तरुणाचा मोबाईल सुद्धा बंद असल्याने विविध शंका कुशंका ला पेव फुटले आहे .सदर बेपत्ता तरुण 5 फूट 5 इंचीचा असून रंग गोरा,शरीर मजबूत,डोळे काळे,केस काळे,अंगात हिरव्या रंगाचा शर्ट,व करड्या रंगाचा प्यान्ट परिधान करून आहे असे वर्णनाचा तरुण निदर्शनास आल्यास नवीन कामठी पोलीस स्टेशन ला संपर्क साधावा असे आवाहन नविन कामठी पोलीस स्टेशन तसेच मिसिंग ची तक्रार करणारे तक्रारदार इम्रान इशान खान वय 38 वर्षे रा डोंगरगाव, जिल्हा राजनांदगाव यांनी केले आहे



