नागपूर २१ : नंदनवन परिसरात वाढदिवसाच्या पार्टीचा आवाज थांबवण्यास सांगितल्याने एक कुटुंब गंभीर संकटात सापडले. मिळालेल्या माहितीनुसार, शेष नगर परिसरात राहणारे जाहीद शेख, आझाद शेख आणि अनीस शेख हे तिघे भंगार विक्रेते आहेत. १८ ऑगस्ट रोजी आरोपी आझाद शेखचा वाढदिवस होता. त्यानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीमध्ये अत्यंत मोठ्या आवाजात संगीत लावण्यात आले होते. शेजारी राहणाऱ्या वसीम शेख यांनी त्यांना आवाज कमी करण्याची विनंती केली. मात्र, यावरून वाद पेटला. काही वेळातच आरोपींनी वसीम, त्याचे वडील शेख नजीर (65) आणि आई वहीदा शेख (58) यांच्यावर कुऱ्हाड, चाकू, रॉड आणि हातोड्याचा वापर करून हल्ला केला. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नंदनवन पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दुखापत आणि धमकी देण्याचे गुन्हे नोंदवले असून, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
@filephoto



