कामठी २२ :- कामठी नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नुकतीच नविन प्रभाग रचना जाहीर करण्यात आली.त्यानुसार पूर्वीच्या 16 प्रभागात एक प्रभाग वाढवून 17 प्रभाग करण्यात आले आहेत .नव्याने निर्माण करण्यात आलेल्या स्थानिक प्रभागात मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाले असून अनेक विद्यमान व इच्छुक नगरसेवकांचे गणित कोलमडले आहे.त्यामुळे आगामी निवडणुकीत विद्यमान व इच्छुक नगरसेवकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
नव्या प्रभाग रचनेनुसार कामठी शहर 17 प्रभागात विभागले असून त्यामधून द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार 34 सदस्य निवडुन येणार आहेत.जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेची वैशिष्ट्यमध्ये एकूण 17 प्रभागातुन 34 सदस्यांची निवड ही लोकसंख्येनुसार आरक्षणाची अलबजावनी,
ईच्छुकांमध्ये प्रभाग विभागणीवरून गोंधळ ,जुन्या नगरसेवकांचे राजकीय समीकरण ढवळून निघणार आहे.नविन प्रभाग रचनेवरून कामठी शहरात सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक नागरिक व राजकीय वर्तुळामध्ये मतदार संघ विभागणी वरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जुन्या नगरसेवकांचे गणित बद्दलल्यानें ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
2011 च्या जनगननेनुसार प्रभागनिहाय लोकसंख्या
प्रभाग क्र 1-4642
आडी मस्जिद,
कोळसाटाल मस्जिद
प्रभाग क्र 2-5410
भाजी मंडी,सैलानी अम्मा दर्गा,जुनी गांधी शाळा,चौधरी
मस्जिद,न.प.
तीलकधारी शाळा,शिक्षक शाळा,लोहीया शाळा अँड कॉलेज
प्रभाग क्र 3-5005
प्रभाग क्र 4-4670
नागसेन क्लब, कमला नेहरू शाळा,मोदी कान्व्हेन्ट शाळा,अविनाश शाळा,
प्रभाग क्र 5-4975
जुनी कामठी पोलीस स्टेशन,जुने सिंधी भवन,काजी
मस्जिद,शारदा मंदिर,
प्रभाग क्र 6-4814
अग्रवाल भवन,प्रभात हॉस्पिटल,बँक ऑफ महाराष्ट्र,बँक ऑफ इंडिया,फुल ओली मस्जिद, संतोषी माता मंदिर
प्रभाग क्र 7-5121
पिली हवेली,काली
मंदिर,काल भैरव मंदिर,लक्ष्मी माता मंदिर,ताज चौक, कोळसा टाल बुद्ध विहार
प्रभाग क्र 8-5328
रबबाणी हायस्कुल,इमळीबाग समाज भवन,अब्दुल फारूक सत्तार शाळा,शिव पंचायत मंदिर, वासरीसपुरा
मस्जिद,सरपंच खुर्शीदुल हक स्कुल,इमलिबाग शाळा
प्रभाग क्र 9-5349
वाल्मिक मंदिर,अल्ताफ हॉटेल,शितला माता मंदिर, पोलीस लाईन बस स्टॉप,इस्माईलपुरा मस्जिद,इसमाईलपुरा उर्दू स्कुल
प्रभाग क्र 10-4919
बुनकर कॉलोनी,नवीन कामठी पोलीस स्टेशन,ढोर दवाखाना,खतीजाबाई हायस्कुल,हाजी जोसेफ स्कुल,
प्रभाग क्र 11-4932
दरोगा मस्जिद, लक्ष्मी नारायण मंदिर, शुक्रवारी बाजार, गोयल टॉकीज, अलंकेश्वर बालाजी मंदिर
प्रभाग क्र 12-5206
गणेश मंदिर,हरदास वाचनालय,मोटर स्टँड मस्जिद व हैदरी मस्जिद,
सरस्वती शाळा,बॉईज सरस्वती,सरस्वती कन्व्हेन्ट शाळा,मा शारदा ज्ञान मंदिर शाळा
प्रभाग क्र 13-4881
तहसील कार्यालय कामठी, नगर परिषद जुनी इमारत, दिवाणी न्यायालय, नगर परिषद पाणी वितरण केंद्र,कस्तुरचंद डागा अनाथालय,
रेल्वे स्टेशन, उपजिल्हा रुग्णालय,
उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय
प्रभाग क्र 14-5530
बालाजी मंदिर,लकडगंज मस्जिद,ज्वाला माता मंदिर, हॉकी बिल्डिंग एकसिस बँक
प्रभाग क्र 15-5113
राहुल बुद्ध विहार, यशोधरा बुद्ध विहार,वाल्मिकी प्राथमिक शाळा,डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय
प्रभाग क्र 16-5506
रमा नगर ,रेल्वे चौकी,नागपूर रोलिंग मिल,विक्तूबाबा नगर,सैलाब नगर,अनाज गोदाम,मरई माता मंदिर, राणी तलाव,स्मशान भूमी,पोरवाल कॉलेज,डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा
प्रभाग क्र 17-5392
कामठी पॉलिटेक्निक,ड्रॅगन पॅलेस टेम्पल,हरदास शाळा,स्वामी अवधेशानंद शाळा,आरा मशीन लोहा कंपनी,लुम्बीनी नगर मस्जिद
एकूण लोकसंख्या:-
86793
एकूण नगरसेवक -34


