spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेवर अशोक शिंदे व किरण कोरडे यांची यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड.

यवतमाळ 30 :  २९ जूनला रविवार रोजी दुपारी १.०० वाजता होटेल टुलीप गार्डन्स येथे  महाराष्ट्र राज्य संघटनेकरिता जिल्हा कार्यकारिणीतून दोन प्रतिनिधिंची निवड करण्याकरीता सभा घेण्यात आली.
या सभेकरिता महाराष्ट राज्य संघटनेच्यावतीने वर्धा येथील दोन निवडणूक अधिकारी म्हणून नरेश शेवाळे, सतीष सहारे यांच्या उपस्थितित अशोक शिंदे, किरण कोरडे यांची निवड स्थानीक कार्यकारिणी सदस्यांनी केली. या दोन प्रतिनिधिना महाराष्ट राज्य संघटनेचे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आले. असे निवडणूक अधिकारी नरेश शेवाळे आणि सतिष शहारे यांनी विजयी म्हणून घोषीत करण्यांत आले. यावेळी कार्यकारिणी पदाधिकारी राजू हनवते, श्रीराम खत्री, तुषार गुजलवार, मदन केळापुरे, सचिन कदम, प्रवीण आगलावे, सुनील बोरकर, रवींद्र चव्हाण, महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेची स्थानिक प्रतिनिधी संतोष शिरभाते किशोर भेदरकर उपस्थित होते.

Popular Articles