लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे : राज्यमंत्री जयस्वाल

0
50

सचिन चौरसिया रामटेक २५ :  अण्णा भाऊ साठे यांची ओळख संपूर्ण देशात एका लोकशाहीर म्हणून आहे. विशेषतः दलित, वंचित, शोषित यांच्या मध्ये त्यांची प्रतिमा एका लोकप्रिय जनकवीची आहे. आपल्या लेखनातून त्यांनी हाशियावरील समाजाला आक्रमक भाषा दिली. जनचेतना निर्माण केली. लोकांना आपल्या हक्कांसाठी जागरूक केलं. झोपलेल्या समाजात सामाजिक क्रांतीचा अलख जागवला. ते बोलतांना म्हणाले समाजाला आवश्यक उपाययोजना तथा शासकीय लाभ कशा पद्धतीने मिळवून देण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहू असे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले. लहुजी शक्ती सेना नागपूर जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्यात पहिल्यांदाच रामटेक येथे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जिल्हास्तरीय जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक विष्णू भाऊ कसबे तर प्रमुख अतिथी म्हणून माझी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी सुद्धा मी सदैव समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे मत स्पष्ट केले. माजी नगरसेवक बीकेंद्र महाजन यांनी सुद्धा समाजाला मार्गदर्शन केले. भाजपा अनु.जाती. मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथां माजी जि.प.सदस्य सतीश डोंगरे, नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रभाकर खेडेकर, सामाजिक कार्यकर्ता गोपी कोल्हेपरा, राजेश शाहू, मुन्ना गुप्ता, मौदा पंचायत समितीचे उपसभापती खेमराज चापले, गजानन बावणे, महेश खोडके, रवींद्र खडसे, महेंद्र प्रधान, सागर जाधव, दिपालीताई वानखेडे, अंकुश बावणे, दयाल बावणे, रमेश पाडन, उमेश पटले, मीडिया प्रभारी नितीन भाऊ दोडके व अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितीन दुन्डे, आकाश खडसे, निखिल शिंदे, शुभम खडसे, राकेश दुंडे, दिनेश दुंडे, जगदीश हत्ती ठेले, मंगेश खंडाळे, राजेश खंडाळे, आकाश खंदार, संदेश खडसे, शुभम बावणे, व अनेक पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.  कार्यक्रमाला जिल्हाभरातून अनेक पुरुष महिला मंडळी व लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहुजी शक्ती सेना नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष अंकुश बावणे यांनी केले तर आभार सतीश डोंगरे यांनी मानले