spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कुंभारे कॉलोनीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड १४ जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल; रोख रक्कम व मुद्देमाल जप्त

स्लग:-98 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त
कामठी ता प्र 25:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कुंभारे कॉलोनी येथे स्वर्निम कडबे यांच्या घरी गुप्तचर पद्धतीने सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाड घालण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त झाल्याची कारवाही नवीन कामठी पोलिसांनी काल सायंकाळी 6 दरम्यान केली असून या धाडीतून 14 जुगाऱ्याना ताब्यात घेत त्यांच्यावर कलम 4,5 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अनव्ये गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून 52 तास पत्ते, एक चटई, नगदी 7320 तसेच विविध महागडे  कंपनीचे 10 मोबाईल असा एकूण 98 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या या 14 जुगाऱ्यात स्वर्निम कडबे वय 24 वर्षे रा कुंभारे कॉलोनी ,रितेश राउत वय 27 वर्षे रा घोरपड, सुरेश टेंभरे वय 35 वर्षे रा कुंभारे कॉलोनी,
अश्विन दिनकर वय 30 वर्षे रा घोरपड,सुधीर तिरसकर वय 30 वर्षे रा घोरपड,विपीन बर्वे वय 36 वर्षे रा कुंभारे कॉलोनी,पवन मेश्राम वय 41 वर्षे रा कुंभारे कॉलोनी,पंकज गवई वय 32 वर्षे रा कुंभारे कॉलोनी,संकल्प शंभरकर वय 30 वर्षे रा कुंभारे कॉलोनी,नरेंद्र जांभुळकर वय 53 वर्षे रा कुंभारे कॉलोनी,शेख कासीम शेख वाहिद वय 40 वर्षे रा नयाबाजार, अभिषेक पाल वय 27 वर्षे रा कुंभारे कॉलोनी, नवीन कोडापे वय 30 वर्षे रा कुंभारे कॉलोनी, आकाश नगरारे वय 29 वर्षं रा कुंभारे कॉलोनी कामठी समावेश आहे. ही यशस्वी कारवाई डीसीपी निकेतन कदम,एसीपी यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनार्थ एपीआय सचिन यादव व डी बी पथकाने केली.

@filephoto


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.