नागपूर, ता.२६ : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने महानुभाव पंथाचे संस्थापक, थोर तत्त्वज्ञ भगवान श्री. चक्रधर स्वामी यांच्या अवतरण दिनानिमित्त सोमवारी (ता.25) विनम्र अभिवादन करण्यात आले.
नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात आयोजित छोटेखानी समारंभात मनपाचे सहायक आयुक्त श्याम कापसे यांच्या हस्ते श्री चक्रधर स्वामी यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, जनसपंर्क विभागातील अमोल तपासे, प्रविण वानखेडे, शैलेश जांभूळकर यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.




