आमरदिप बडगे, गोंदिया (तिरोडा) २७ :- जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील भिवापूर येथील शुभम वसंत मेश्राम यांनी नॅशनल पावर लिफ्टिंग आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविला आहे. पावर लिफ्टिंग स्पर्धा नागपूर येथील सिव्हिल लाईन एम एल ए होस्टेल येथे 21 ऑगस्ट 23 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
शुभम मेश्राम याने180 वजन गटातून राज्यातून दुसरा क्रमांक पटकावून तालुक्याचे नाहीतर आपल्या छोट्याशा भिवापूर गावचे देखील नाव लौकिक केले आहे. त्याचे कौतुक अभिनंदन व शुभेच्छा च्या वर्षात मोठ्या संख्याने केला जात आहे .त्याच्या या यशाबद्दल भिवापूरचे पोलीस पाटील कैलास रामटेके, सुखराम उके, बबलदास रामटेके ,कमल शेंडे, नरेंद्र मेश्राम, प्रदीप मेश्राम , कीर्ती चव्हाण, सुमित रंगारी, निलेश मिश्रा, सुरेंद्र मेश्राम ,मनीष नेवारे, छबिलाल राणे, कमल रंगारी, गणेश शेंडे, देवेंद्र रामटेके, आशिष रामटेके, विकास शेंडे ,यांनी अभिनंदन केले आहे.



