संदीप बलवीर, प्रतिनिधी
वैष्णवी साने हिची सुवर्ण कामगिरी दक्षिण आशियाई ड्युबॉल स्पर्धेत भारताला सुवर्णपदक
टाकळघाट २७ :- टाकळघाट पासून ५ की मी अंतरावरील किरमिटी (भारकस) येथील गरीब, कष्टकरी घरातील वैष्णवी हेमंत साने हिने आपल्या अथक परिश्रमाणे व अष्टपैलू खेळामुळे नुकत्याच संपन्न झालेल्या दक्षिण आशियाई ड्युबॉल स्पर्धेत देशाला सुवर्ण पदक मिळवून दिले.
दक्षिण आशिया तील भारत, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, मालदीव व अफगाणिस्थान अशा सहा देशाचा समावेश असलेल्या या ड्युबॉल स्पर्धेत शेवटचा सामना भारत आणि श्रीलंका संघात रंगला. अत्यंत चूरशिच्या झालेल्या या सामन्यात वैष्णवीच्या अष्टपैलू खेळामुळे भारताने श्रीलंकेवर मात करीत ड्युबॉल स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळाले. वैष्णवीच्या या सुवर्ण कामगिरीमुळे किरमिटी (भारकस) या गावाच्या शिरपेचात मनाचा मनाचा तुरा रोवल्याने ग्रामपंचायत किरमिटी (भारकस) व संपूर्ण ग्रामस्थांनी तिचा सत्कार व अभिनंदन केले. यावेळी नागपूर जिल्हा परिषद चे माजी विरोधी पक्ष नेता आतिष उमरे,गट ग्राप किरमीटी भारकसचे उपसरपंच अतुल गावंडे, महाराष्ट्र प्रदेश लहुजी शक्ती सेना,उपाध्यक्ष गजानन बावणे,सचिव गरिबाजी खोडके, महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य लहुजी शक्ती सेना, दीपाली वानखेडे, साहित्य भूषण अण्णाभाऊ साठे स्मारक समिती बुटी बोरी,अध्यक्ष दयाल बावणे, विदर्भ सरचिटणीस लहुजी शक्ती सेना अंकुश बावणे,वंदना बावणे, अर्चनाताई जाधव, कविता ताकतोडे, अल्काताई वानखेडे, गोपालरावजी वानखेडे, पवन भाऊ गायकवाड, चेतन भाऊ उरकुडे दीपकजी खडसे,चंद्रशेखर बाराहाते, बाबाराव मडावी, अनिल बावणे, बबलू साने, जितेंद्र गावंडे, शीलवान बोरकर,किरण ताई साने,कविताताई आत्राम, अक्षरा साने, ऋषिकेश बावणे आणि संपूर्ण गाव याप्रसंगी उपस्थित होते.



