नागपूर २७ :- नागपूर येथील १९ वर्षीय दिव्या देशमुख हिने बुद्धिबळातील फिडे महिला वर्ल्ड कप जिंकून संपूर्ण विश्वात भारतासह आपल्या नागपूर शहराचे नाव उंचावले.तिच्या या कामगिरीचे कौतुक म्हणून सार्थक फाऊंडेशच्या वतीने नागपूर, वनामती इथे तिचा सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता. यावेळी ग्रामपंचायत बोरखेडी (रेल्वे) च्या वतीने बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी नागपूर जिल्हा परिषदेचे माजी सत्ता पक्ष नेता दिनेश (गुड्डू) बंग, नागपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय चिकटे, ग्रा प सरपंच स्वाती धुर्वे, माजी ग्रा प सदस्य हरीश फंड, प्रशांत रावळे, वसंतराव कांबळे, रमेश झाकणेकर, राम धुर्वे, गणेश पाटील आदी उपस्थित होते



