spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कन्हान, कांद्री शहरात तान्हा पोळा उत्साहाने साजरा

 
कन्हान २८ : – शहरातील विविध नगरामध्ये छोटया लाक डी नंदी बैल सजावट, छोटया मुलांनी विविध पोषाख, वेशभुषा च्या स्पर्धेचे आयोजन करून नंदी बैलासह मुलांना रांगेत तोरणात उभे करून महादेवाचे गाणे म्हणत ” पंच मुखी गौरा पारबती , हरबोला हर हर महादेव ” जय घोष करित तान्हा पोळा उत्साहाने साजरा करण्यात आला.
विवेकानंद नगर उत्सव समिती, हिराबाई शाळा तर्फे तान्हा पोळा साजरा 
स्वामी विवेकानंद नगर उत्सव समिती हिराबाई शाळा तर्फे तान्हा पोळा उत्साहाने साजरा  करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद महिला मंडळ व्दारे सर्व मुलांचे व नंदीची पूजा अर्चना करून सुरूवात करण्यात आली. आयोजक समितीने विशेष मोहीम येथे राबविली. ज्यात पुरातन भारतीय संस्कृती ची पुनरावृत्ती मुलांच्या वेशभुषा च्या माध्यमातुन कर ण्यात आली. लहान मुले आपले नंदी सोबत विविध प्रकारची वेशभुषा करून रांगेत तोरणात उभे होते. त्यां च्या प्रोत्साहनकरिता निरीक्षक समितीने मुलांना पारि तोषिक देण्यात आले. ज्यात वेशभुषा प्रथम पारितोषि क शिवम संदीप डहाके, द्वितीय श्रावणी किशोर नाईक, तृतिय रुद्र अभिषेक बेलसरे, चतृर्थ पार्थवी चिंचुलकर ला देण्यात आले. तसेच नंदी बैल सजावट
प्रथम पुरस्कार अरव भूषण छाणीकर, दृतिय रित्विक अक्षय अडकणे, तृतिय आदर्शश्री आशिष वाढणकर,
चतृर्थ काशी सरोजकर यांच्या नंदी बैलाने पटकविले. पोळयात सहभागी सर्व मुलाना प्रोत्साहनपर बक्षिष देण्यात आले. कार्यक्रमाचे पुरस्कार वितरण निरीक्षक समिती द्वारे मा. किशोर बेलसरे, धनराज ढोकरीमारे, मुसाफिर सिंग, मधुकर धोपाडे, तुळशीराम छाननीकर, मनोज नायडु, बापुराव नितनवरे, जनार्दन बागडे, सुधा कर वानखेडे आदीच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमा च्या यशस्वितेकरिता आयोजक गणेश रामापुरे, कॅप्टन सतिश बेलसरे, हरीश पोटभरे, आशिष वानखेडे, नरेंद्र कुर्वे, दिनेश नानवटकर, निलेश सहारे, अभिषेक बेलसरे, रवि हांडे, आकाश अडकने, बाबुराव नितनवरे, कुणाल तडस, विष्णु बेहरा, राकेश भरणे, शंकर राय, नितेश भरणे, कुणाल बावणे, लोकेश दमाहे, राजीव चौधरी सह स्वामी विवेकानंद नगर उत्सव समिती व हिराबाई शाळा कन्हान च्या कार्यकर्त्यानी सहकार्य केले.
   गणेश नगर येथे तान्हा पोळा उत्साहाने जाजरा
गणेशनगर येथे मोरेश्वरजी अनकर यांच्या हस्ते  तोरणा उभे असलेल्या लाकडी नंदी बैलाची पुजा करून छोटया मुलांना नगदी रूपये, चॉकलेट व पेन वाटप करून महादेवाचे गाणे म्हणुन ” एक नमन गौरा पारबती हरबोला हर हर महादेव ” चा जय घोषात सर्वाना प्रसाद वितरण करून तान्हा पोळा उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी यशवंत निर्वाण, भूषण निंबाळकर, रामुजी ठाकरे, वसंतराव इंगोले, नथ्थुजी पाजुर्णे, मोतीराम रहाटे, माधव काटोके, सुनील सरोदे, कैलाश महल्ले, जितेश मोहने, राहुल बारापात्रे, चेतन वैद्य प्रामुख्याने उपस्थित होते. तान्हा पोळ्याच्या यशस्विते करिता ओम अनकर, रोहित नाटकर, वैभव खैरकर, उत्कर्ष रहाटे, रोशन उईके, चीत्रांश पार्जुर्णे, बादल महल्ले आदीनी सहकार्य केले.
शिवनगर तारसा रोड येथे ताना पोळा साजरा
 
शिवनगर तारसा रोड प्रमुख पाहुणे सु्र्यभान कुंभलकर, आशिष दिवटे, शरद वाटकर यांच्या हस्ते नंदी बैलाची पुजा करून ताना पोळ्यात उपस्थित विविध वेशभुषेत पोषाक परिधान बाल गोपाल मुलानी नंदीबैल पण आकर्षित सजावट करून तोरणात आणल्याने रोक बक्षीस, शैक्षणिक साहित्य, बोटल, मुलांना खाऊचे मान्यवरांचा हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन ऋषी कोचे, निर्णय कुंभलकर‌ यांनी केले तर चंद्रभान कुंभलकर,  सुनंदा दिवटे, सविता नाटकर यांनी सहकार केले. महादेवा च्या गाने गाऊन व गर्जना करीत पोळा फोडण्यात आला. यावेळी ज्ञानेश्वर हुड, गौरव भोयर, ऋृषभ बावनकर, पुष्पलता कुंभलकर, इंदु कोचे, मीना कुंभलकर, जया कुंभलकर आदी उपस्थित होते.
राम नगर येथे तान्हा पोळा थाटात साजरा
विदर्भातील एक जुना उत्सव असलेल्या तान्हा पोळा रामनगर कन्हान येथे बळीराजा यांच्या प्रतिमेचे  पूजन करून तान्हा पोळा ची सुरूवात करण्यात आली. उत्सवी पोशाख परिधान करून प्रभागात लहान बालगोपालानी सुंदर सजवलेल्या लाकडी बैलांना घेऊन परिसरातुन मिरवणुक काढुन तोरणा रांगेत उभे होताच नंदीबैलाची पुजा करून शांताराम जळते, राजेंद्र गाडवे, अनिल जाधव, सौ. लताताई जळते हयानी परीक्षण करून मा. सेवकराम चौधरी, मुरलीधर नानोटे, संजय करंडे, रमेश जामदार, बाबुराव महेन्द्रकर, मधुकर नागपुरे, किशोर तिवसकर, सुरेश वंजारी, दिनेश खाडे यांच्या हस्ते बाल गोपालाना बक्षी स वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता आयोजक शिवशंकर (चिंटु) वाकुड़कर, दीपक कुंभलकर, अनिकेत नानोटे, करण पाली, सचिन कटरे, बाल्या गायकवाड, सुमेध नितनवरे, प्रितेश पौनीकर आदी सह नगरातील नागरिकांनी सहकार्य केले.
जय शीतला माता मंदिर मेन रोड कांद्री कन्हान
राष्ट्रीय महामार्गावरील जय शीतला माता मंदीर कांद्री-कन्हान व्दारे लहान मुलांचा तान्हा पोळा उत्सव साजरा करण्यात आला. मंदिर कमेटी अध्यक्ष मा. संजय चौकसे व सामाजिक कार्यकर्ता महेश मंगतानी, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश ढोके, वसंता राऊत यांचे हस्ते नंदीबैलाचे पुजन करून बालगोपालांना चिप्स, कॅडबरी चाकलेट भेट वस्तु देऊन प्रसाद वाटप करण्या त आला. याप्रसंगी नगरपंचायत कांद्री मुख्याधिकारी मा. सचिन गाढवे, कन्हान थानेदार वैजयंती मांडवधरे हयानी सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी ग्रा प सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, वामन देशमुख, अशोक खैरकार, रविंद्र कोत्तपलीवार, राहुल पोटभरे, सुजित पानतावणे, चंडी प्रसाद, अनिल विश्वकर्मा, गोकुल पटेल, बादल विश्वकर्मा, मोर्याजी, ओमदास लाडे, गणेश शाहु, पारस मरघडे, प्रेमचंद चव्हाण, रोशन बोरकर, नरेश रक्षक, प्रमोद मानकर, हिरालाल बिहुणे, अरुण बावनकुळे, दिनेश यादव, अमोल मोहोड, रामचंद्र, राजकुमार, राजेश पोटभरे, सुनिल बागडे आणि महिला बघिनी, बाळ गोपाळ उपस्थित होते.

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.