spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

व्हीव्हीवाय १९८७ बॅचचा गत २६ वर्षापासूनचा उपक्रम.

 

यवतमाळ 1 : विवेकानंद विद्यालय व्हीव्हीवाय १९८७ च्याद्वारे विशुद्ध विद्यालय संचालित राणी लक्ष्मीबाई विद्यालय, विवेकानंद विद्यालय, यवतमाळ व व्यकंटेश विद्यालय, घोडखिंड येथे प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.  मागील २६ वर्षांपासून सदर बॅचच्या वतीने शाळेचा पहिला दिवस साजरा केला जातोय. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत व सोबतच पाचव्या वर्गात प्रवेश करणाºया सर्व मुला-मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप या निमित्याने केल्या जाते. या वर्षीचा प्रवेशोत्सव २७ जून रोजी राणी लक्ष्मीबाई विद्यालय, विवेकानंद विद्यालय, यवतमाळ व व्यकंटेश विद्यालय येथे पार पडला.
सकाळी ८ वाजता राणी लक्ष्मीबाई विद्यालय, यवतमाळ येथे विशुद्ध विद्यालयाचे अध्यक्ष विनायकराव दाते यांच्या शुभहस्ते साजरा करण्यात आला. यावेळी व्हीव्हीवाय १९८७ च्या गृपचे प्रा. डॉ. प्रदिप झिलपिलवार यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेत ज्ञानार्जनाची भूक ही आपल्या ठायी असली पाहिजे. त्याकरिता परिश्रमाची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे, असे मार्गदर्शनपर उद्बोधन केले. तसेच मेघा भास्करवार यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  संस्थेचे सचिव कासलीकर, शाळेचे मुख्याध्यापक प्रसाद कुळकर्णी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी व्हीव्हीवाय १९८७ या बॅचचे स्वागत केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत व पाचव्या वर्गात नव्याने प्रवेशीत विद्यार्थ्यांनां शैक्षणीक साहित्याचे वाटप करण्यात आले.
त्यानंतर व्यकंटेश विद्यालय, घोडखिंड येथे देखील सर्व ग्रामीण भागातील प्रवेशीत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. व पाचवीत प्रवेशीत विद्यार्थ्यांनां शैक्षणिक साहित्याचे वाटप व्हीव्हीवाय १९८७ बॅचच्या सदस्यांसह संस्थाध्यक्ष विनायकराव दाते व मुख्याध्यापिका स्वाती जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्हीव्हीवाय १९८७  या बँचचे बाळासाहेब शिंदे व वासुदेवराव विधाते यांनी विद्यार्थ्यांनां समोचित मार्गदर्शन केले. या स्वागत सोहळ्याला व्हीव्हीवाय १९८७ बॅचचे अजय सक्रावत, श्यामकांत डगवार, प्रंशात पोहणकर, अजय दहिवलकर, उमेश हांडा, हरिभाऊ दोरशेटवार, राजेश देशमुख, संजय शेलार, प्रा. डॉ. सुशील बत्तलवार, प्रा. प्रदीप झिलपिलवार प्रामुख्याने उपस्थित होते.
बॉक्स प्रवेशोत्सव साजरा करण्याचा सरकारचा अलीकडील निर्णय हा नवा असला तरी गेल्या सव्विस वर्षांपासून व्हीव्हीवाय १९८७ हा उपक्रम राबवित आहेत. सदर उपक्रमाची दखल घेऊन शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्यात येत असल्याचे मत माजी विद्यार्थी अ‍ॅड. वासुदेव विधाते यांनी विवेकानंद विद्यालय येथे विद्यार्थ्यांना उद्बोधन करताना सांगितले.

Popular Articles