नागपूर :- श्री निकेतन आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, तुळशीबाग रोड, नागपूर येथे आयोजित आंतरमहाविद्यालयीन मेहंदी स्पर्धेत हजरत बाबा ताजुद्दीन कला व वाणिज्य महाविद्यालय, ताजाबाद शरीफ, उमरेड रोड, नागपुर येथील विद्यार्थिनी रोझी फातिमा हिने प्रथम पारितोषिक प्राप्त करून महाविद्यालयाचा गौरव वाढविला. यास्पर्धेत विविध महाविद्यालयां तील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. हजरत बाबा ताजुद्दीन कला व वाणिज्य महाविद्यालया च्यावतीने रोझी फातिमा हिच्यासह झीनत फिरदौस,आलिया नूर, अदीबा खान आणि अनमिता कौसर या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. सर्व विद्यार्थिनींनी आपल्या कलात्मक कौशल्याचे प्रदर्शन करीत महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले. त्यामध्ये रोझी फातिमा हिने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून विशेष यश संपादन केले. या उल्लेखनीय यशाबद्दल शादाब एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल सलीम अब्दुल जब्बार, व सचिव मोहम्मद शादाब अब्दुल सलीम आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शकील सत्तार यांनी रोझी फातिमा तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थिनींचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाविद्यालया तील प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थिनींच्या यशाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे आणि विविध सांस्कृतिक व सहशैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, हे महाविद्यालयाचे उद्दिष्ट आहे. रोझी फातिमा हिने मिळविलेले हे यश महाविद्यालयासाठी अभिमानास्पद असून, इतर विद्यार्थ्यांनाही विविध कला व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
हजरत बाबा ताजुद्दीन कला व वाणिज्य महाविद्यालयांतील विद्यार्थी रोझी फातिमा हिला आंतरमहाविद्यालयीन मेहंदी स्पर्धेत प्रथम पारितोषिक









