नागपूर २८ : आगामी येणाऱ्या गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या सणोत्सवचा बंदोबस्त असल्याने सणोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता दिनांक २६/०८/२०२५ रोजी श्री रमेश बरकते, उपविभागीय पोलीस अधिकारी, रामटेक उपविभाग, रामटेक आणि पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात, प्रभारी अधिकारी, पोलीस स्टेशन पारशिवणी यांचे उपस्थितीत पारशिवणी पोलीसांनी रूट मार्च काढला. सदर रूट मार्च पोलीस स्टेशन, बॅक ऑफ इंडीया चौक, शिवाजी चौक, गांधी चौक, बाजार चौक ते परत पोलीस स्टेशन या मार्गाने घेण्यात आला. रूट मार्च दरम्यान गांधी चौक येथे दंगा काबू योजने बाबत सराव घेण्यात आला. सदर रूट मार्च व दंगा काबू योजनेत पोलीस स्टेशन पारशिवणी तसेच रामटेक उपविभागातील पोलीस स्टेशन रामटेक, अरोली, देवलापार येथील अधिकारी आणि अंमलदारांसह दंगा नियत्रंण पथक आणि गृहरक्षक उपस्थित होते. रूट मार्च आणि दंगा काबु योजना राबवुन नागपुर ग्रामीण पोलीस दलातर्फे जनतेने सणोउत्सव आनंदाने, निर्भयतेने तसेच शांततेत साजरा करण्याबाबत आवाहान करण्यात आले आहे.
Home Latest News सणोत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पारशिवणी पोलिसांचा रूट मार्च आणि दंगा काबू...



