पारशिवनी :- पोलीस स्टेशन पारशिवणी दिनांक १४/०९/२०२५ रोजी पारशिवणी पोलीसांना गुप्तबातमीदारा मार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा गुढरीवांढे शिवारात काही इसम ५२ ताशपत्तयांचा जुगार खेळत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन धाड टाकुन आरोपी १) रामदास संतोश इंगोले, वय ६१ वर्ष, रा. चनकापुर, त.सावनेर २) नरेश गनपत देवगडे, वय ४७ वर्ष, रा. गुढरी वांढे, ता. पारशिवनी ३) प्रफुल आनंदराव काळे, वय ३६ वर्ष, रा. गुढरी वांढे, ता. पारशिवनी ४) जयराम उमराव ठाकरे, वय ४२ वर्ष, रा. गवना ता. पारशिवनी, जि. नागपुर यांना ५२ ताशपत्तयांचा जुगार खेळतांना जागीच पकडले. तसेच आरोपी कमांक ५) गणेश सातनुरकर, ६) शंकर इंगोले ६) प्रतिक मेश्राम तिन्ही रा. सोनेगाव ता. पारशिवनी हे पोलीसांना पाहुन पळुन गेले. पोलीसांनी आरोपीतांच्या ताब्यातुन ५२ तास पत्ते व रोख रक्कम १,५००/- रूपये तीन अॅडड्रॉईड मोबाईल आणि दोन मोटर सायकल असा एकुण १,११,५५०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नमुद आरोपीतांविरूध्द पोलीस स्टेशन पारशिवणी येथे १२ म जु का अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Home Latest News गुंढरीवाढे येथे अवैधरित्या ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या आरोपीतांविरूध्द गुन्हा नोंद, पारशिवणी पोलीसांची...



