spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अवैधरित्या मोहाफुल गावठी हातभट्टीची दारू काढणाऱ्या आरोपींवर गुन्हा नोंद

– २१ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त

उमरेड :- संध्याकाळी १९:३० वाजेच्या सुमारास उमरेड पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा गरडेपार शिवारात अवैधरित्या रनिंग भट्टी द्वारे मोहाफुल गावठी काढत आहे. मिळालेल्या माहीती च्या आधारे पोलीस पथकाने नमुद घटनास्थळी जावुन धाड टाकुन कारवाई केली असता दोन इसम हातभट्टी लावुन दारू गाळतांना दिसुन आले. पोलीसांनी पाहुन दोन्ही इसम पळुन गेले. पळुन गेलेल्या आरोपींची नावे १) मोरधन राजेराम राजपूत, वय ५० वर्ष आणि २) आतेश पुरूषोत्तम राजपूत, वय ३८ वर्ष, दोन्ही रा. गरडेपार असे असल्याची माहीती पोलीसांना प्राप्त झाली.

पोलीसांनी रनिंग भट्टी नष्ट करून घटनास्थळावरून ३१० किलोग्रॅम मोहाफुल सडवा आणि २८ लिटर मोहाफुल गावठी दारू, रनिंग भट्टी चे साहीत्य लोखंडी जळाउ लाकुड पाईप आणि इतर असा एकुण २१,३००/- रूपयांचा जप्त केला. नाशवंत मुद्देमाल मौक्यावर पंचनामा कार्यवाही करून नष्ट करण्यात आला. नमुद २ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.