spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आजाद समाज पार्टीच्या आढावा बैठकीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

नागपूर :- आजाद समाज पार्टी (कांशीराम) च्यावतीने रविवारी रविभवन, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे पक्षाची समीक्षा व आढावा बैठक उत्साहात पार पडली. आगामी काळातील पक्षाची संघटनात्मक बांधणी, विविध सामाजिक प्रश्नांवर पक्षाची भूमिका तसेच नागपूर जिल्हा व शहरातील पक्षाच्या कामकाजाचा आढावा यावेळी घेण्यात आला. प्रदेश संपर्क प्रमुख उमेश हिवराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उमेश हिवराळे – महाराष्ट्र संपर्क प्रमुख पूर्व विदर्भाध्यक्ष नितीन नागदेवते, प्रदेश महासचिव तथा जिल्हा इन्चार्ज अँड. संजय वानखेडे, प्रदेश महासचिव जे.बी. रामटेके, प्रदेश सचिव दिगंबर पलटणकर, जिल्हाध्यक्ष ओपूल तामगाडगे तसेच पश्चिम नागपूर निलेश राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकी दरम्यान नागपूर जिल्हा व शहरातील विविध भागांमधील अनेक कार्यकर्त्यांनी आजाद समाज पार्टीमध्ये प्रवेश केला. उमेश हिवराडे, नितीन नागदेवते व जिल्हाध्यक्ष ओपूल तामगाडगे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.

यावेळी नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना जिल्हा, शहर तसेच विविध विधानसभा मतदारसंघांतील पदांची जबाबदारी देण्यात आली. संबंधितांना नियुक्तीपत्र देऊन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये मुस्लिम व ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांचाही समावेश असल्याचे पक्षा च्यावतीने सांगण्यात आले. आशिष निस्वादे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी, शोएब कुरेशी यांची जिल्हा महासचिवपदी, तर विशाल बनसोड, सूरज पुराणिक आणि रोशन ठवरे यांची जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. सदूभाऊ यांची शहर महासचिवपदी तर वैभव सोनटक्के यांची शहर सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय असित पाटील यांची दक्षिण नागपूर विधानसभा अध्यक्षपदी, तर बादल बनसोड यांची दक्षिण- पश्चिम नागपूर विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने या नियुक्त्या महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत. यावेळी दीक्षा चौरे, अश्विन पाटील, विक्की वानखेडे, राजू मेश्राम, जुगनू डांगरे, अश्विन सोनटक्के, हर्षनंद तामगाडगे, अथांग करोडे, दीपक पाटील, अजय गायकवाड, अतिश शंभरकर, निखिल ढेंगरे आणि अतिश बनकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनीही पक्षात प्रवेश केला. बैठकीला शहर उपाध्यक्ष मेश्राम, उमरेड विधानसभा अध्यक्ष रवींद्र पाटील, कामठी विधानसभा अध्यक्ष थूल यांच्यासह पक्षाचे विविध विधानसभा, शहर व जिल्हा कार्यकारिणी तील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आगामी काळात नागपूर जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्या सोबतच सर्वसामान्य नागरिक, वंचित घटक, युवक आणि विविध सामाजिक घटकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन पक्षाचे काम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार या आढावा बैठकीत व्यक्त करण्यात आल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमुळे नागपूर शहर व जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यास मदत होणार असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.