spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आम आदमी पार्टी नागपूर तर्फे “वोट चोर, गद्दी छोड़” आंदोलन

नागपूर २० : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महाल, नागपूर येथे आम आदमी पार्टी (AAP) नागपूर तर्फे “वोट चोर, गद्दी छोड़” या देशव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून जोरदार नारेबाजी आणि निदर्शने करण्यात आली. हे आंदोलन शहर सह संघटन मंत्री गिरीश तितरमारे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.

अलीकडेच देशभरातील वृत्तपत्रे आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बातम्यांमधून हे स्पष्ट झाले आहे की, भारतीय जनता पार्टीने (BJP) मुख्य निवडणूक आयोगाच्या (ECI) मदतीने मतदार चोरी करून सत्तेवर कब्जा केला आहे, असा गंभीर आरोप AAP कार्यकर्त्यांनी केला.

आंदोलनात असा आरोप करण्यात आला की, मुख्य निवडणूक आयोग आणि बीजेपी सरकार मिळून लोकशाही संपवण्याचे षड्यंत्र रचत आहेत. अलीकडेच आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न देता विषय टाळण्यात आला, ज्यामुळे आयोगाची भूमिका थेट BJP सरकारच्या समर्थनार्थ असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा करण्यात आला.

जसे ब्रिटिश राजवटीविरुद्ध क्रांती करून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले गेले, त्याचप्रमाणे आज लोकशाही वाचवण्यासाठी देशव्यापी आंदोलनाची गरज निर्माण झाली आहे, असे मत AAP नेत्यांनी व्यक्त केले.संविधानानुसार देश लोकशाही पद्धतीने चालवला जावा, अशी ठाम भूमिका आम आदमी पार्टीने घेतली आहे.

या आंदोलनात रोशन डोंगरे, सचिन लोणकर, अल्का पोपटकर, शैलेश गजभिये, प्रशांत अहिरराव, जवाद अहमद, जॉय बांगडकर, अंकुश ढोणे, संगीता बाथो, मंजू फोपरे, विना भोयर, इरशाद अली, शाहिस्ता बानो, सुदाम पाल, शशांक वैद्य, शिरीष तिडके, प्रदीप भांडणे, प्रशांत मिशुलकर यांसह अनेक कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.

Popular Articles