– टेकाडी व परिसरातील नागरिकांसाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल
कन्हान :- आपली बस टर्मिनल, सिताबर्डी, नागपुर ते तार कंपनी टेकाडी पर्यंत एनएमसी ची नवीन ‘आपली बस’ सेवा सुरू करण्यात आली आहे. या बस सेवेमुळे टेकाडी व परिसरातील नागरिकांना नागपुर कडे ये-जा करण्यासाठी सुलभ, सुरक्षित व सोयीस्कर सार्वजनिक वाहतुक सुविधा उपलब्ध झाली आहे.
सोमवार (दि. २८) सप्टेंबर २०२६ ला नागपुर-जबलपुर महामार्गावरील तार कंपनी, टेकाडी येथे आपली बस टर्मिनल सिताबर्डी, नागपुर ते तार कंपनी, टेकाडी पर्यंत आपली बस सेवेचा शुभारंभ सोहळा पार पडला. मा. रिंकेश चौरें उपाध्यक्ष नगरपरिषद कन्हान-पिपरी तथा महामंत्री भाजपा नागपुर जिल्हा ग्रामीण यांच्या अध्यक्षेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . यावेळी वेंकट कारेमोरे सहअध्यक्ष मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्ते योजना रामटेक विधानसभा समिती तथा माजी जिल्हा परिषद सदस्य, बिरेन्द्र सिंह अध्यक्ष भाजपा कन्हान मंडळ, लाकेध्वर वासाडे उपाध्यक्ष भाजपा कन्हान मंडळ यांच्या प्रमुख उपस्थित भगवानदास यादव यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन ‘आपली बस’ सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या बससेवेमुळे टेकाडी व परिसरातील विद्यार्थी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला-पुरुषांना नाग पुर येथे ये-जा करण्यासाठी सुरक्षित व सोयीस्कर सार्व जनिक वाहतुक सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असुन या सुविधे मुळे दैनंदिन प्रवास अधिक सुलभ होणार आहे.यावेळी अविनाश कांबळे, देवेंद्र सिंह सेंगर, विषाधर कांबळे, राजु गुरधे, अमित यादव, चरणसिंह यादव, सौरभ यादव, गणेश मस्के, कृष्णा कांबळे, सुरेंद्र बुधे, विलास हुड, कमल पुरी, सुरेश मोहाडे, सूर्यभान टाकळखेडे, होमऱाज कांबळे, असलम खान, सुबोध यादव यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



