आसमान फाउंडेशन तर्फे भोरगड (काटोल) येथील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

0
19

नागपूर :- आसमान फाउंडेशन, नागपूरच्या वतीने काटोल तालुक्यातील भोरगड येथील इंग्रजी माध्यम शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक सत्रानिमित्त शालेय साहित्य, ड्रॉइंग बुक व कलर बॉक्सचे वाटप करण्यात आले. यासोबतच आश्रम शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. यावेळी आसमान फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. रवी गिऱ्हे यांनी भोरगडसारख्या दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेल्या आश्रमशाळा प्रशासनाचे कौतुक करत त्यांचे आभार मानले. फाउंडेशन तर्फे दरवर्षी प्रमाणे या भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला आसमान फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. रवी गिऱ्हे, सचिव नरेश शेंडे, संचालक दिनेश टेकाडे, आसमान महिला क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षा व फाउंडेशनच्या संचालिका मेघा गिऱ्हे, आश्रमशाळेचे अधीक्षक सुदर्शन पोटोडे, शिक्षकवृंद तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.