कोदामेंढी :- गुरुवार (ता. ८ ऑक्टोबर)ला खात – रेवराल जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या गावातील विविध भागातील गणेश मंडळांना चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आलेली वर्गणी माजी भाजपा तालुका मौदा मंडळ अध्यक्ष मुकेश अग्रवाल, माजी जिल्हा परिषद सदस्य राधा मुकेश अग्रवाल यांच्याहस्ते प्रदान करण्यात आली. या शुभप्रसंगी मंडळांना भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेण्यात आले. तसेच, सध्याच्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटातून लवकरात लवकर सुटका होऊ दे आणि सर्वांवर बाप्पाची कृपा राहू दे, अशी प्रार्थना करण्यात आली.
या कार्यक्रमादरम्यान संबंधित गावांमधील गणेश मंडळांचे पदाधिकारी, तरुण कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वर्गणी वितरण सोहळ्यादरम्यान गावकऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला.
खात – रेवराळ सर्कल अंतर्गत येणाऱ्या गावातील सहभागी गणेश मंडळे आणि अध्यक्षां मध्ये
बाळगोपाल गणेश उत्सव मंडळ (खात वॉर्ड क्र. ४): अध्यक्ष – सचिन समरीत ,
बाळगोपाल गणेश उत्सव मंडळ (खात वॉर्ड क्र. २): अध्यक्ष – योगेश देवतारे ,
श्री संत तुकाराम गणेश उत्सव मंडळ (खात वॉर्ड क्र. ३): अध्यक्ष – मयूर धांडे ,
बाल गणेश उत्सव मंडळ (देवमुंढरी): अध्यक्ष – एकनाथ पंचबुधे,
नायुग गणेश उत्सव मंडळ (धर्मापुरी): अध्यक्ष – संतोष पडोळे,
भाऊ गणेश उत्सव मंडळ (खंडाळा): अध्यक्ष – अर्जुन महानंद ,
बाल गणेश उत्सव मंडळ (खंडाळा): अध्यक्ष – चक्रधर गभणे ,
बाल गणेश उत्सव मंडळ (नवरगाव): अध्यक्ष – संजय श्रीरसागर ,
बाल गणेश उत्सव मंडळ (सुंदरगाव): अध्यक्ष – ज्ञानेन्द्र मेश्राम ,
श्री गणेश उत्सव मंडळ (मांगली तेली): अध्यक्ष – संदीप फटिंग यांच्या समावेश आहे.








