spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

हाजी दादा हासम चिनी अँड सन्स वर कारवाई

175 किलो प्लास्टीक जप्त
10 हजार रुपये दंड

चंद्रपूर १०  – भानापेठ येथील हाजी दादा हासम चिनी अँड सन्स या दुकानावर चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने कारवाई करून 175 किलो प्लास्टीक जप्त केले आहे शिवाय प्लास्टीकचा साठा करणाऱ्या दुकानदाराकडुन 10 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.सदर व्यावसायिकावर ही तिसरी कारवाई असुन यापुढे साठा मिळाल्यास 25 हजार रुपये दंड व गुन्हा दाखल केला जाणार आहे.
चंद्रपूर महानगरपालिका मनपा उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे सदर कारवाई करण्यात आली असुन सदर व्यावसायिकास सक्त ताकीद देण्यात आली आहे. पुन्हा सदर गुन्हा केल्यास फौजदारी कारवाई करण्याचे मनपा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.मनपा हद्दीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास सातत्याने कारवाई केली जात असुन प्लास्टीक पिशव्यांच्या साठयाबाबत गुप्त माहीती देणाऱ्यास 5 हजारांचे बक्षिस सुद्धा जाहीर करण्यात आले आहे.यास मोठा प्रतिसाद मिळुन मनपापर्यंत प्लास्टीक साठ्याची गुप्त माहीती पोचविण्यात येत आहे.
एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना 2018 नुसार दंड आणि 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे. सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ. अमोल शेळके,भुपेश गोठे,मनीष शुक्ला,राज हजारे, शुभम खोटे,शुभम चिंचेकर,राहुल गगपल्लिवर,पूनम समुद्रे यांच्याद्वारे करण्यात आली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.