– सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अजिंक्य वखरे यांना ‘जीरो माइल आयकॉन-2026 स्वास्थ रत्न’ पुरस्कार
– सिनर्जी फिटनेसच्या माध्यमातून फिटनेस क्षेत्रात उल्लेखनीय योगदान;
– ‘जीरो माइल’ राष्ट्रीय हिंदी साप्ताहिकाचा २१ वा वर्धापन दिन उत्साहात
नागपूर :- उद्योजकता, सामाजिक बांधिलकी, शासकीय जनजागृती, ग्रामीण विकास, पर्यावरण संवर्धन तसेच सांस्कृतिक आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित ‘जीरो माइल आयकॉन अवॉर्ड- 2026’ सोहळ्यात सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर व सिनर्जी फिटनेसचे संस्थापक अजिंक्य वखरे यांना प्रतिष्ठेच्या ‘स्वास्थ (फिटनेस) रत्न पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. जीरो माइल राष्ट्रीय हिंदी साप्ताहिक अखबार व जीरो माइल फाउंडेशन, नागपूर यांच्या २१व्या वर्धापन दिनानिमित्त हॉटेल तुली इम्पेरियल येथे ‘जीरो माइल आयकॉन अवॉर्ड-2026’ तसेच विशेषांक विमोचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. याच प्रसंगी फिटनेस क्षेत्रातील योगदानाची दखल घेत अजिंक्य वखरे यांना ‘स्वास्थ रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्रीरामनारायण मिश्र आणि आनंद शर्मा यांच्या हस्ते अजिंक्य वखरे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सिनर्जी फिटनेसच्या माध्यमातून व्यायाम, शारीरिक तंदुरुस्ती आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच फिटनेस क्षेत्राला व्यावसायिक आणि आधुनिक दृष्टिकोन देण्यासाठी वखरे यांचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल अजिंक्य वखरे यांनी आयोजकांचे आभार मानत फिटनेस हा केवळ शरीरयष्टी घडविण्याचा विषय नसून, निरोगी आणि सकारात्मक जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग असल्याचे सांगितले. समाजातील प्रत्येक घटकाने नियमित व्यायाम, योग्य आहार आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा स्वीकार करावा, यासाठी भविष्यातही कार्य करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी रामनारायण मिश्र, सुनील दत्त शर्मा, रवि बोराटकर, डॉ. निलेश अग्रवाल, आचार्य पं.सुधीर शास्त्री, सुदर्शन चक्रधर, डॉ.महेंद्र सेठ, विकास मिश्रा, डॉ. प्रवीण डबली, डॉ. संजीवनी चौधरी, चंदू गलगलीकर, आशीष खरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन जीरो माइलचे मुख्य संपादक डॉ. आनंद शर्मा यांनी केले. यावेळी कार्यकारी संपादक विद्या शर्मा तसेच ज्येष्ठ लेखापाल मोहम्मद सलीम यांचीही उपस्थिती होती. ‘जीरो माइल’ राष्ट्रीय हिंदी साप्ताहिकाने आपल्या २१व्या वर्षात पदार्पण करताना आयोजित केलेल्या या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. पुरस्कार वितरण, विशेषांक विमोचन आणि मान्यवरांचा गौरव अशा विविध उपक्रमांनी सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या कार्यक्रमात अजिंक्य वखरे यांना मिळालेला ‘स्वास्थ रत्न’ पुरस्कार त्यांच्या फिटनेस क्षेत्रातील कार्याचा गौरव करणारा ठरला.



