spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अखिल खेडुला कुणबी समाजचा विदर्भ स्तरीय उपवर वर- वधू परिचय मेळावा थाटात

नागपूर :- अखिल खेडुला कुणबी समाज, नागपुर च्यावतीने नुकत्याच झालेल्या मागच्या रविवारी 8 फेब्रुवारी ला प्रगती सभागृह दिघोरी उमरेड रोड नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विशेष प्रमुख पाहुणे महापौर निता ठाकरे, आमदार मोहन मते, ब्रम्हपुरी नगराध्यक्ष योगेश मिसार, इतर पाहुणे अभय सिंगाडे सुधाकर ठेंगडी. पुरुषोत्तम सहारे, जयप्रकाश दाणी, राजेश राउत, उदय पिलारे, महेश्वर धांडेकर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर पिलारे व सचिव सुधाकर भरें मंचावर उपस्थित होते.

या कार्यक्रमात 300 उपवर वर -वधू करिता आलेल्या मुलें व मुलींनी आपला परिचय करून दिला. याप्रसंगी समाजा च्यावतीने स्मरणिका तयार करण्यात आली स्मरणिकेचे विमोचन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुण्यांचे शाल, बुके व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. विविध खेळामध्ये विशेष प्राविण्यप्राप्त मुलिंना सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सहसचिव नंदकिशोर अलोणे,  स्वाती राऊत, आचल ठाकरे आणि आभार प्रदर्शन संजय बुल्ले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अरुण राउत, मनोहर कुथे, मुरलीधर भर्रे, मोरेश्वर दोनाडकर, दयाराम सहारे, लक्ष्मणराव शिकारी, प्रमोद खरकाटे, गोपीचंद पारधी विजय तोंडरे, चंद्रकांत राउत, शंकर बुरडे, अशोक बुरले, तसेच महिला कार्यकर्त्या  सुनिता अलोणे,  उत्पला पारधी, शुभांगी दोनाडकर, वैशाली डोणारकर, वैशाली ठाकरे, मेधा साहारे, सौ. पूजा बुल्ले, ईत्यादींनी परिश्रम घेतलेत.

Popular Articles