नागपूर :- अल्कोहोलिक्स अनॉनिमस (AA) नागपूर कन्व्हेन्शन 2026 चा भव्य उद्घाटन समारंभ शुक्रवार, दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मांगली फार्म हाऊस, नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहेत. तीन दिवसीय कन्व्हेन्शन 9, 10 व 11 जानेवारी 2026 दरम्यान होणार आहे. या उद्घाटन समारंभास एम्स (AIIMS) नागपूरचे संचालक तसेच नागपूर कारागृहाचे उपमहानिरीक्षक (DIG) यांच्या प्रमुख उपस्थितीचा सन्मान लाभणार आहे. या सोबतच शहरातील मान्यवर अतिथी, समाजसेवक, वैद्यकीय तज्ज्ञ, माध्यम प्रतिनिधी तसेच अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. अल्कोहोलिक्स अनॉनिमस ही एक आंतरराष्ट्रीय, स्वैच्छिक व ना- नफा संस्था असून मद्यव्यसनाच्या समस्येत अडकलेल्या व्यक्तींना अनुभव, शक्ती व आशा यांचे आदान- प्रदान करुन संयमित व सकारात्मक जीवन जगण्यास मदत करते. ही संस्था कोणत्याही धर्म, जात, वर्ग किंवा राजकीय विचारधारेशी संलग्न नाही तसेच पूर्णतः स्वयंपूर्ण आहे. या उद्घाटन समारंभा च्यामाध्यमातून समाजात व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य, सेवा, एकता व आशा यांचा प्रभावी संदेश दिला जाणार आहे. कन्व्हेन्शन दरम्यान देशभरातून आलेले सदस्य आपले अनुभव मांडतील, ज्यामुळे मद्यव्यसनाशी झुंज देणाऱ्या व्यक्तींना तसेच त्यांच्या कुटुंबियांना नवीन दिशा व प्रेरणा मिळेल. उपस्थित पत्रकार परिषदेमध्ये डॉ. संध्या पवार यांनी पत्रकारांना माहिती दिली. याप्रसंगी राजू B, शकील M, देवेंद्र G, राजेंद्र T, रविन्द्र N, उमेश J, राजू S यांची उपस्थिती होती.








