spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे – मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांचे आवाहन

– मनपात जनगणना सेल स्थापन होईल

नागपूर :- जनगणनेच्या कार्यक्रमाला लवकरच सुरू होणार असून, यासाठी ६००० प्रगणक व १००० सुपरवायजर यांची नियुक्ती केली जाणार आहे. या राष्ट्रीय कार्यात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली. या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी मनपात जनगणना सेल स्थापन करण्यात येणार आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरांची नोंदणी केली जाणार आहे. यावेळी डिजिटल माध्यमातून जनगणना होणार आहे.

जनगणने कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या संदर्भात मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी (ता. 27) जनगणनेशी संबधित सर्व चार्ज अधिकारी तथा सहायक आयुक्त यांची बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त, वैष्णवी बी., उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त गणेश राठोड, वृक्ष संवर्धक अमोल चौरपगार प्रामुख्याने उपस्थित होते.

‘जनगणना से जन कल्याण’ हे ब्रीद घेऊन हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवर राबविला जाणार असल्याचे आयुक्तांनी बैठकीत सांगितले. दोन टप्प्यात हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण दोन टप्प्यात असेल, पहिले प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर फिल्ड ट्रेनरचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी योग्य कर्मचाऱ्यांची निवड करावी, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. वर्ष 2011 च्या जनगणना नुसार नागपूरची लोकसंख्या 24 लाख 5 हजार 665 एवढी होती. यात पुरुषांची संख्या 12 लाख 25 हजार 405 तर महिलांची संख्या 11 लाख 80 हजार 260 एवढी आहे. या जनगणनेच्या कार्यासाठी मनपाच्या मुख्यालयात जनगणना सेल स्थापन करण्यात येणार आहे. यामुळे सर्वेक्षणानंतर येणाऱ्या माहितीचे संकलन या सेलमध्ये करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या कामाचा दर आठवड्याला आढावा घेण्यात येईल. या कामात टाळाटाळ किंवा कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्तांनी यावेळी दिला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.