spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

प्रहार मिलिटरी स्कूल रवीनगर येथे मराठी राजभाषा दिन अत्यंत उत्साहात साजरा

नागपूर :- प्रहार मिलिटरी स्कूल, रवीनगर येथे मराठी राजभाषा दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी खापरखेडा येथील शाळेचे सुपरवायझर नरेंद्र माहूरतले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना कुलकर्णी यांचीही मान्यवर उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता पूजनाने करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. मराठी भाषेच्या गौरवाचा आणि अभिमानाचा वातावरणात संपूर्ण कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषेवर आधारित एक लघुनाट्य सादर करण्यात आले. नववीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, इयत्ता आठवीसाठी प्रश्नमंजुषा, पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कथाकथन स्पर्धा, तर इयत्ता सातवीसाठी जास्तीत जास्त म्हणी सांगण्याची स्पर्धा घेण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी मराठी भाषेचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना मातृभाषेचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सारिका डांगोरे यांनी प्रभावीपणे केले. संगीत शिक्षक पटेल व मृणाल काटे यांनी “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” या गीताचे सुंदर सादरीकरण केले. कार्यक्रमाची सांगता ‘पसायदान’ म्हणत करण्यात आली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.