spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कामठी नगर परिषद विषय समित्यांच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष

कामठी :- 21 डिसेंबर ला जाहीर झालेल्या कामठी नगर परिषद निवडणूक निकालानंतर नगराध्यक्षपदी भाजपचे अजय अग्रवाल तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (अजित पवार )च्या सबा परवीन तौसिफ खान विराजमान झाले तर या 34 सदस्यांपैकी नगराध्यक्ष सह 20 सदस्य भाजप प्रणित असलेले कामठी नगर विकास आघाडीत असून गटनेता नगरसेवक लालसिंग यादव तर कांग्रेस च्या 14 सदस्य गटात गटनेता नगरसेवक काशिनाथ प्रधान म्हणून कार्यरत असून एम आई एम आई एम च्या नगरसेविका रुबिना शेख ह्या तटस्थ आहेत हे इथं विशेष!तर स्वीकृत सदस्य म्हणून कामठी नगर विकास आघाडीतून भाजप चे योगेश गायधने तसेच राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष (अजित पवार,) मधून माजी नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत तसेच कांग्रेस गटातून माजी नगरसेवक आसिफ सरमतीया व सेवानिवृत्त मुख्याध्यापक धीरज यादव यांच्या नावाची वर्णी लागली. तर या घडामोडी नंतर आगामी काही दिवसात विषय समित्यांची निवडणूक होऊ घातली आहे यामध्ये सत्ताधारी कोणत्या नगरसेवकाला कोणती जवाबदारी देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर महत्वाच्या समिती वर वर्णी लागावी म्हणून भाजप ला समर्थन देणाऱ्या राष्ट्रवादी,बसपा, बरीएम,अपक्ष नगरसेवक अपेक्षीत इच्छा बाळगून आहेत.

कामठी नगर परिषद च्या 17 प्रभागातील 34 सदस्यात भाजप 8, कांग्रेस 14,राष्ट्रवादी 4,बसपा 3,एम आई एम आई एम 1, बरीएम 1,समाजवादी पार्टी 1, 2 अपक्ष नगरसेवक निवडून आले आहेत.संख्याबळ बघता नगराध्यक्ष भाजप चा निवडून आला असला तरी संख्यबळ तुलनेतून सभागृहात कांग्रेसची सत्ता बसली असती पण समीकरण जुळवा जुळवीत आलेल्या अपयशामुळे तसे ठरले नाही. भाजप बरीएम ची युती तुटली असूनही भाजप विरोधात लढलेले बरीएम नगरसेवक नियाज कुरेशी व बरीएम समर्थीत नगरसेवक आकाश भोकरे भाजप प्रणित असलेले कामठी नगर विकास आघाडीत सहभागी झाले तसेच भाजप चा कट्टर विरोध असलेले आंबेडकर वादी पक्ष असलेले बसपाचे दोन नगरसेविका व एक नगरसेवक असे तीन न प सदस्य हे ही भाजप समर्थीत असलेले कामठी नगर विकास आघाडीत समावेश झाले.असे करता नगराध्यक्ष सह भाजप प्रणित कामठी नगर विकास आघाडीत 20 सदस्य झाले पन कांग्रेस च्या गटात 14 हुन एकही सदस्य वाढला नसल्याची शोकांतिका आहे. तर आगामी विषय समिती निवडनुक लक्षात घेता कुणाला कोणती समिती मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्वात महत्वाच्या स्टेंडिंग (स्थायी)समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हे नगराध्यक्ष असतात त्यांच्यासह एकूण 9 सदस्य संख्या असलेल्या समितीमध्ये 5 विषय समित्यांचे सभापती सदस्य व अन्य तीन सदस्य नगरसेवकामधून निवडले जातात.अन्य विषय समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम,शिक्षण, आरोग्य व स्वच्छता, पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समिती ,नियोजन आणि विकास तसेच महिला व बाल कल्याण समिती चे सभापती सदस्य निवड होणार आहे तर आर्थिक उलाढाल असलेल्या बांधकाम ,आरोग्य व पाणीपुरवठा समिती वर वर्णी लावण्यासाठी इच्छुक फिल्डिंग लावत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.