Monday, March 9, 2026
spot_imgspot_img
spot_img

बळीराजाच्या कल्याणाचा सर्व समावेशक अर्थसंकल्प

– आ. डॉ. परिणय फुके यांच्याकडून अर्थ संकल्पाचे जोरदार स्वागत

हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- राज्यातील महायुती सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा राज्याच्या हितासह भावनिक दृष्ट्याही महत्वाचा आहे. अजितदादा पवार यांच्या अकाली व अपघाती निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत दादांच्या स्वप्नपूर्तीकडे एक पाऊल टाकले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना घोषित करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. २ लाखापर्यंत कर्ज थकीत असलेल्य शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्यात येईल. तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कधीही लोकप्रियतेसाठी काही केले नाही. या अर्थसंकल्पातून ही प्रचिती आली. त्यांनी लोकप्रिय घोषणाऐवजी धोरणात्मक गोष्टीवर गोष्टीवर भर दिला. २०४७ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरवर नेण्याचा संकल्प हा राज्याच्या वेगवान विकासाचे संकेत देत आहे.

विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी एकात्मिक परिसंस्था निर्माण करण्याचा निर्णय शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानासह बळकट करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शेती अभियान य नव्या योजनेतून शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सध्या कृषी उत्पन्नात पशसंवर्धनाचा वाटा १५ टक्के आहे. यात वाढ करण्यात येणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यात एमएसएमई केंद्र सुरु करण्याची घोषणा राज्यात उद्योग वाढ़ व रोजगार वाढीसाठी ऐतिहासिक पाऊल आहे. स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना राबविण्यात येणार आहे. एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शेतकरी, तरुनांसाठी हा संजीवनी ठरणारा आहे.

याशिवाय विरोधकांनी कितीही विरोध केला असला तरी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पुढेही कायम सुरु राहणार आहे. याशिवाय गरीब, वंचितासाठी योजना, उद्योजकांना बळ, पायाभूत सुविधामध्ये वाढ़ अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. लोककल्याणकारी सर्व समावेशक अर्थसंकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे अभिनंदन.

– आ. डॉ. परिणय फुके विधानपरिषद सदस्य


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com