spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सशक्त भविष्य अन् आरोग्यासाठी धावल्या महिला

– आरोग्य प्रतिसजग राहण्याचा दिला संदेश

– मनपाच्या भव्य ‘पिंक मॅरेथॉन’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्त्री-शक्तीचा जागर व स्त्रीत्वाचा सन्मान करण्यासाठी आयोजित ‘पिंक मॅरेथॉन’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सशक्त भविष्य आणि स्वतःच्या आरोग्यासाठी हजारोच्या संख्येत महिलांनी स्पर्धेत सहभाग घेत आरोग्य प्रति सजग राहण्याचा संदेश दिला. या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध समाजसेविका अमृता देवेंद्र फडणवीस यांनी केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर निता ठाकरे होत्या.

यशवंत स्टेडियम येथे आयोजित कार्यक्रमात उपमहापौर  लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीच्या सभापती  अश्विनी जिचकार, विधी विशेष समिती सभापती निधी तेलगोटे, क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड,महिला व बालकल्याण विशेष समिती सभापती  सारिका नांदुरकर, जलप्रदाय विशेष समिती सभापती  दिव्या धुरडे, शिक्षण विशेष समिती सभापती संतोषदेवी लढ्ढा,मनपा अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी.,उपायुक्त मिलिंद मेश्राम,उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अमृता फडणवीस यांनी आपल्या सुमधुर गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अमृता फडणवीस यांनी महिला सुदृढ असल्यास समाज सशक्त होईल असे प्रतिपादन केले. तर महापौर निता ठाकरे यांनी कार्यक्रम स्थळी हजाराच्या संख्येत उपस्थित झालेल्या महिलांमुळे ही सकाळ ऊर्जावाण झाल्याचे सांगितले.

रविवारी पहाटे उपस्थित झालेल्या सर्व स्पर्धकांचे झुम्बा डान्सद्वारे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक शकील पटेल, नगरसेवक पवन कोये, कल्पना शर्मा, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले,उपायुक्त मंगेश खवले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, अग्निशमन विभागाचे जवान, उपद्रव पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे, कार्यक्रमाचे सूत्रसंचनल डॉ. रिचा सुगंध यांनी केले.

समाजसेविका अमृता फडणवीस यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती यांचा सत्कार

महिला दिनानिमित्त समाजसेविका अमृता फडणवीस यांच्या हस्ते मनपातील महापौर निता ठाकरे, उपमहापौर  लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीच्या सभापती  अश्विनी जिचकार , विधी विशेष समिती सभापती निधी तेलगोटे, क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड,महिला व बालकल्याण विशेष समिती सभापती सारिका नांदुरकर, जलप्रदाय विशेष समिती सभापती  दिव्या धुरडे यांचा सत्कार करण्यात आला.

“पिंक मॅराथॉन” स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. १६ वर्षांखालील महिलांसाठी ३ किमी आणि सर्वसामान्य गटासाठी ५ किमी व विशेष पिंक रन ही २ किलोमीटर होती. प्रथम तीन विजेत्यांना रोख बक्षीस तर इतर विजेत्यांना आकर्षक बक्षीस देण्यात आली.

3 किलोमीटर रनचे विजेते अनुक्रमे

मिताली भोयर- प्रथम

अंजली मडावी- द्वितीय

भव्यश्री महल्ले- तृतीय

जान्हवी बावणे

पूजा पंचबुधे

निकिता शाहू

स्नेहल जोशी

भुवनेश्वरी मसराम

स्वाती पंचबुधे

संजना जोशी

5 किलोमीटर रनचे विजेते अनुक्रमे

रुही रामेकर – प्रथम

हिमांशी बावणे- द्वितीय

रिशा रामेकर- तृतीय

मृणाली बुरडे

नव्या चितळे

सानिया खान

अर्णवी महल्ले

प्रेरणा काळे

जागृती कामळे

जान्हवी खराबे

2 किलोमीटर फन रन अनुक्रमे

मानसी ठाकरे,पूजा दुबे,अश्विनी पांढरे

उत्कृष्ट वेशभूषा स्पर्धेत

अनुष्का शर्मा,शिवण्या शर्मा, चंचल सोनुले, आनंदी बाबुळ, पारितोषिक प्रधान करण्यात आले तसेच 75 वर्षीय शकुंतला काटनाडे यांनी पाच किलोमीटरची स्पर्धा पूर्ण केल्यामुळे त्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.

एचपीव्ही लसीकरणबाबत जनजागृती

कार्यक्रमाच्या औचित्याने नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राज्य शासनाच्या सूचनेनुसार शहरात एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेबाबत जनजागृती करण्यात आली.या मोहिमेअंतर्गत १४ ते १५ वर्ष वयोगटातील (१५ वा वाढदिवस न झालेल्या) मुलींना एचपीव्ही लस देण्यात येणार आहे. शहरातील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

Popular Articles