spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर कामठी तालुका अध्यक्षपदी आनंद मेश्राम यांची नियुक्ती

कामठी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट) यांच्या तर्फे ग्रामीण नागपूरचे अध्यक्ष राजा टाकसाळे यांनी कामठी तालुका अध्यक्षपदी आनंद मेश्राम यांची नुकतीच निवड केली असून त्यांच्यावर जबाबदारी सोपविली की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्याला वाढवायचा आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आनंद मेश्राम यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते व युट्युब पत्रकार आनंद मेश्राम यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनैत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, राजू जैन, राजा टाकसाळे आणि नौशॉद सिद्दीकी यांची दिलगिरी बाळगून मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच उच्चस्तरावरून मेश्राम यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Popular Articles