नागपूर :- मुंबई सह राज्यातील महानगरपालिका मध्ये सफाई कामगारांना हक्काची घरे देण्यात यावे, आरोग्य सुविधा, शैक्षणिक, उपाययोजना करण्यात यावे या मागणीसाठी कर्मचारी युनियन नेते अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचे लक्ष वेधण्यासाठी यशवंत स्टेडियम येथे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी धरणे मंडपात आंदोलन कर्तांची भेट घेतली. या आंदोलनात तन, मन, धनानी पाठिंबा जाहीर केला. याप्रसंगी राजु पांजरे, प्रा.रमेश दुपारे, प्रविण आवळे, पुण्यशील बोदिले, अजय मुन सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.








