खापा :- फ्यूचर अग्रीकल्चर लीडर्स आफ इंडिया अंतर्गत स्थानिक जीजामाता हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वर्ग नऊ चा नुकताच पास झालेला विद्यार्थी भावेश खुबाळकर ने आधुनिक तंत्रज्ञानाने गाईची गौशाला तयार केली. या अवाढव्य अशा गायीच्या गोठ्याला फालीची शिक्षिका पल्लवी वालके यांनी आपल्या विद्यार्थिनींसोबत गौशाला निरीक्षण केले. यावेळी विद्यार्थ्यांनी गायीच्या प्रजाती, त्यांचे खाद्य, लसीकरण तसेच त्यापासून मिळणारे उत्पन्न व दुधापासून बनवण्यात येणाऱ्या विविध उत्पादनाबद्दल विद्यार्थ्यांनी माहिती घेतली. तसेच या क्षेत्रभेटीमध्ये गाईचे व्यवस्थापन करून शेतीला जोडधंदा म्हणून कसे उपयोगी ठरेल व पशु व्यवसायाकडे विद्यार्थी आता सकारात्मक दृष्टीने बघतील. अशी आशा फाली शिक्षिका पल्लवी वाळके, मुख्याध्यापक सुधाकर गजभिये व इतर शिक्षक वृंदांनी बाळगली.








