यवतमाळ :- नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत टप्पा-2 अंतर्गत जिल्हयातील 559 निवडलेल्या गावांमध्ये सुक्ष्म नियोजन प्रक्रिया राबवुन मृद व जलसंधारण विषयक कामे करण्यात येणार आहेत. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांमध्ये शेती पाणी व पर्यावरण व्यवस्थापनाबाबत जागृकता निर्माण करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने समाज घटकातुन नेतृत्व विकसीत करुन शाश्वत तंत्रज्ञान व नवसंशोधनाचा प्रसार करणे, पाण्याचा ताळेचंद आधारित पिकपध्दती सूक्ष्मसिंचन, जलव्यवस्थापन तंत्राचा प्रभावी वापर करणे प्रत्थावित आहे. त्या अनुषंगाने गाव अनुकुलन आराखडयातील प्रस्थावित नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन (एन आर एम) कामांविषयी गावस्तरावर व्यापक जागृकता निर्माण करणे आणि मृद व जलसंधारण कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता जिल्हयातील प्रति उपविभागस्तरावर 1 या प्रमाणे एकुण 4 नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन समन्वयक एन आर एन-कुरदिनाटर यांची विहित मार्गदर्शक सूचनेनुसार नेमणूक करावयाची आहे.
निवडीचे निकष शैक्षणिक पात्रता: BSW किंवा MSW पदवी अनुभव,एन आर एम पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन विषयक शासकीय/निमशासकीय/अशासकीय संस्थांसोबत किमान 3 वर्षांचा अनुभव वयोमर्यादा, 1 डिसेंबर 2025 रोजी वय 50 वर्षांपेक्षा कमी असावे, मृद व जलसंधारण, मृदा प्रकार, पाणी साठवण संरचना, धूप नियंत्रण याबाबत मूलभूत तांत्रिक माहिती आवश्यक, समुदाय संघटन, सामाजिक जनजागृती, लोकांना प्रेरित करण्याची क्षमता व प्रभावी संवादकौशल्य पात्र उमेदवारांनी आपले अर्ज 19 डिसेंबर 2025 पर्यंत जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे सादर करावेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव यासह आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. ही नेमणूक 11 महिन्यांच्या मानधन तत्वावर करण्यात येणार आहे.
प्रकल्पाच्या गरजेनुसार कराराचा कालावधी कमी-जास्त केला जाऊ शकतो. काम समाधानकारक नसल्यास उमेदवाराला कामावरून कमी करण्याचे अधिकारही प्रकल्प व्यवस्थापनाकडे राहतील.प्राप्त सर्व अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर 1:5 प्रमाणात उमेदवारांची जिल्हास्तरीय समितीकडून मुलाखत घेऊन अंतिम निवड करण्यात येणार आहे.अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे संपर्क साधावा.




