spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अनुसूचित जमाती प्रगर्गासाठी मत्स्यव्यवसायाच्या 25 योजनासाठी अर्ज आमंत्रित

यवतमाळ :- जिल्हयातील ३६६ गावांचा “धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान” या योजनेत समावेश असून प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेची सहयोजना सन २०२४-२५ ते २०२८-२९ या ५ वर्षाच्या कालावधीसाठी “अनुसूचित जमाती” या प्रवर्गासाठी आयुक्त मत्स्यव्यवसाय, यामध्ये मत्स्यव्यवसायासाठी २५ योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे.

जिल्हयातील ३६६ गांवातील इच्छुक अनु. जमातीच्या प्रवर्गातील अर्जदारांनी एन एफ डी बी च्या विहित नमुन्यातील अर्ज, हमीपत्र, प्रकल्प अहवाल, आधार कार्ड, जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र (असल्यास), फोटो व रहीवाशी दाखला इ. कागदपत्रे जोडून चार प्रतीमध्ये अर्ज सादर करण्याचे ठिकाण सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), यवतमाळ प्रशासकीय इमारत, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, यवतमाळ अंतिम तारीख २२ डिसेंबरपर्यंत सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व पात्र अनु. जमाती प्रवर्गातील अर्जदारांनी नियमांनुसार परिपूर्ण प्रस्ताव निर्धारित वेळेत सादर करावेत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागातर्फे करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.