कामठी :- कामठी तालुक्यातील सर्व नागरिकांना निवासी अतिक्रमण नियमितीकरण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तहसिलदार गणेश जगदाळे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या 25 मार्च 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार कामठी तालुक्यातील शासकिय जमिनीवर वर्षानुवर्षे राहणाऱ्या कुटुंबांना हक्काचे घर मिळावे या उद्देशाने एक विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यानुसार 1 जानेवारी 2011 पर्यंतची अतिक्रमणे नियमित करणास पात्र राहतील.
ज्यांचे अतिक्रमण 500 चौरस फूट आहे त्यांना नियमितकरणासाठी कोणतेही शुल्क नाही.1जानेवारी 2011 रोजी निवासी अतिक्रमण असल्याच्या पुराव्यासाठी मतदार यादीतील नाव,विजबिल ,मालमत्ता कराची पावती आदी पुरावे ग्राह्य धरले जातील.तरी सदर योजनेकरिता पात्र नागरिकांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रासह संबंधित नगर परिषद,नगरपंचायत, ग्रामपंचायत प्रशासन या ठिकाणी 31 डिसेंबर 2026 पर्यंत सादर करावेत .जे नागरिक मुदतीत अर्ज करणार नाहीत त्यांच्यावर भविष्यात प्रशासनाकडून कारवाई होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी त्वरित अर्ज सादर करावेत .तरी 31 डिसेंबर 2026 पर्यंत अर्ज करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा व कायदेशीररित्या आपले घराचे स्वप्न पूर्ण करावे असे आवाहन तहसिलदार गणेश जगदाळे यांनी केले आहे.