spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खुल्या चेंबरवर झाकणे प्राधान्याने लावा

– महापौर निता ठाकरे यांचे लकडगंज झोनच्या बैठकीत निर्देश

नागपूर :- पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन सखल भागात पाणी साचणार नाही, तसेच गडरलाईनच्या खुल्या चेंबरवर त्वरित झाकणे लावण्यात यावे, असे निर्देश महापौर निता ठाकरे यांनी दिले.

पावसाळ्यापूर्वी झोनमधील तयारीचा आढावा घेण्यासाठी महापौर प्रत्येक झोनमध्ये जाऊन लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहेत. याच मालिकेत महापौरांनी (ता. 15) लकडगंज झोन कार्यालयामध्ये नगरसेवक व झोनच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला सत्ता पक्षनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर, लकडगंज झोनच्या सभापती माहेश्वरी बिसेन, आरोग्य समितीच्या सभापती मनीषा अतकरे, शिक्षण समितीच्या सभापती संतोषदेवी लढ्ढा, मालमत्ता कर समितीच्या सभापती सरिता कावरे, नगरसेवक हरीश रारोकर, नगरसेविका अर्चना पडोळे, नगरसेविका दुर्गेश्वरी कोसेकर, नगरसेवक अरुण हारोडे, नगरसेवक प्रदीप पोहाणे, नगरसेविका शितल विजय रारोकर, नगरसेवक  राजेश्वर दिवटे, नगरसेवक दीपक वाडीभस्मे, नगरसेविका निरंजना पाटील, नगरसेवक राजकुमार साहू, नगरसेवक शेषराव गोतमारे यांच्यासह उपायुक्त राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सहाय्यक आयुक्त विजय थूल, कार्यकारी अभियंता सचिन रक्षमवार उपस्थित होते. प्रारंभी लकडगंज झोनच्या सभापती  महेश्वरी बिसेन यांनी महापौर निता ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

लकडगंज झोनच्या नगरसेवकांनी वॉर्डातील नागरी सुविधांच्या संदर्भात प्रामुख्याने तक्रारी मांडल्या. नगरसेवक प्रदीप पोहाणे यांनी कळमना मार्केट नाल्याच्या संरक्षण भिंतीचा मुद्दा उपस्थित केला. यावर लोखंड जाळी लावण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सूचना केली. यावर महापौर निता ठाकरे यांनी त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले.

अनेक नगरसेवकांनी गडरलाईनच्या खुल्या चेंबरचा मुद्दा उपस्थित केला. पावसाळ्याचे दिवस असल्याने या चेंबरवर लोखंडी किंवा सिमेंटचे झाकणे त्वरित लावण्याची मागणी केली. महापौरांनी यावर सुद्धा प्रशासनाने खुले चेंबर राहणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना केली. लकडगंज झोनमध्ये असलेल्या नालेसफाईचा मुद्दा उपस्थित केला. लकडगंज भागात गडर लाईनच्या सफाईचा मुद्दा उपस्थित केला. लकडगंज झोनमध्ये असलेल्या अतिक्रमणावर त्वरित कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी यावर महापौर ठाकरे यांनी अतिक्रमण हटविण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले.

Popular Articles