– आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
यासीन शेख, गोंदिया तिरोडा :- तिरोडा तालुक्यातील बोदलकसा येथे उजव्या कालव्याच्या नुतनीकरणासाठी तब्बल ३१ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून, या महत्त्वपूर्ण कामाचे भूमिपूजन आज आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.या कालव्याच्या नुतनीकरणामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, सिंचन सुविधेत लक्षणीय सुधारणा होणार आहे. यामुळे शेती उत्पादन वाढीस लागून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमात बोलताना आमदार रहांगडाले यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि सिंचन सुविधांच्या बळकटीकरणासाठी शासन कटिबद्ध आहे. बोदलकसा उजवा कालवा नुतनीकरण प्रकल्पामुळे या भागातील शेतीला नवसंजीवनी मिळणार आहे भूमिपूजन कार्यक्रमाला प्रामुख्याने
रजनी कुंभरे, सभापती,समाजकल्याण विभाग जि.प. गोंदिया , तेजराम चव्हाण, सभापती प.स.तिरोडा,जितेंद्र रहांगडाले, सभापती कृऊबास तिरोडा,अशोक असाटी, अध्यक्ष न.प.तिरोडा, जि.प.सदस्य जगदीश बावणथडे एँड.माधुरी रहांगडाले, प्रवीण पटले चत्रभूज बिसेन, तुमेश्वरी बघेले , किरण पारधी ,मदन पटले, उपाध्यक्ष जि.प.गोंदिया,भाऊराव कठाणे, उपाध्यक्ष भाजप गोंदिया,.वसंत भगत, विधानसभा प्रमुख, रवींद्र वहिले, मंडळ अध्यक्ष भाजप ठाणेगाव, संतोष चौधरी, मंडळ अध्यक्ष ,सुनंदा पटले, उपसभापती, प.स.तिरोडा भूमेश्वर रहांगडाले, उपसभापती कृउबास तिरोडा प.स.सदस्य कविता सोनेवाने, जयप्रकाश पटले, कुंता पटले, प्रमिला भलाई, सदस्य चेतलाल भगत. हुपराज जमाईवार, ज्योती शरणागत, दिपाली टेंभेकर,.रिता पटले, विजय बिन्झाडे, चेतलाल पटले, सरपंच ग्रा.प.बोदलकसा ,सरिता तुमसरे,सरपंच, ग्रा.प.इंदोरा खुर्द मनोज राऊत , सरपंच ग्रा.प.निमगाव,अनिता धुर्वे सरपंच ग्रा.प.बरबसपुरा व गावकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.