spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाराष्ट्रात महिला अधिकारी सुरक्षित आहे का ? पत्रपरिषदेत सवाल अरुण गाडे.

नागपूर ०५ : या संदर्भात कास्टस्ट्राईब फेडरेशनचे अध्यक्ष अरुण गाडे यांनी पत्रकारांना माहिती दिली की सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग नागपूरच्या सुकेशनी तेलगोटे यांच्या कार्यालयातील कार्यरत कर्मचारी सुनील शिंदे यांनी त्यांच्या कक्षात दरवाजाला लाथ मारून आत मध्ये प्रवेश करून मॅडमला मारण्याची धमकी दिली तसेच आग पेटीची काळी घेऊन पेटवून देण्याची धमकी देवू लागला.
विभागातील कर्मचारी एकत्र आल्यामुळे तो तिथून पळून गेला. त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रकार परिषदेमध्ये अरुण गाडे यांनी केली. पत्रकार परिषदेत उपस्थित मंचावरील मायाताई उके प्रा. राहुल मून, रणजीत रामटेके अरविंद पाटील, संजय अंभोरे, शामराव हाडके, प्रा. मधुकर उईके आणि राजेंद्र ढिंगरे यांची उपस्थिती होती.

Popular Articles