Home Latest News ‘पौर्णिमा दिनानिमित्त पंचशील चौक येथे जनजागृती

‘पौर्णिमा दिनानिमित्त पंचशील चौक येथे जनजागृती

0
130

नागपूर, ता. १० :  पर्यावरणासाठी उर्जेची बचत करण्यासाठी मनपाच्या पुढाकाराने सुरू झालेल्या नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी (ता.९)’पौर्णिमा दिनानिमित्त’ पंचशील चौक येथे रात्री उर्जा बचतीच्या संदर्भात जनजागृती करण्यात आली. या अभियानाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

माजी आमदार तथा माजी महापौर प्रा.अनिल सोले यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या या अभियानाला व्यापारी आणि नागरिकांनी उदंड प्रतिसाद दर्शवित आहेत. यावेळी स्वच्छ भारत नागपूरचे ब्रँड अँबेसिडर व ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे कौस्तव चॅटर्जी,  सुरभी जयस्वाल, शीतल चौधरी,  मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव,  प्रिया यादव,  श्रीया जोगे,  पार्थ जुमडे, पिनाकी बानिक  यांनी जनजागृती केली. ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी व्यापारी बांधवांना एक तास विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला पंचशील चौक परिसरातील व्यावसायिक, दुकानदार, नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या अभियानात स्थानिक नागरिकांनी देखील उत्साहाने सहभाग नोंदवून मनपाला सहकार्य केले.