spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

कामठी :- उपजिल्हा रुग्णालय, कामठी, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र (UPHC), कामठी व आयुष्मान आरोग्य मंदिर, तालुका कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावर्षीच्या “दोन जन्मांमध्ये योग्य अंतर – कुटुंब सुदृढ निरंतर” या घोषवाक्यानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित गर्भवती माता (ANC Mothers) यांना कुटुंब नियोजनाचे महत्त्व, दोन अपत्यांमधील योग्य अंतर राखण्याचे फायदे, मातृ व बाल आरोग्य, सुरक्षित मातृत्व तसेच शासनामार्फत उपलब्ध विविध कुटुंब नियोजन साधने व सेवांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. माहिती, शिक्षण व संवाद (IEC) उपक्रमाद्वारे जनजागृती करण्यात आली तसेच उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

या कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेश मोटे, वैद्यकीय अधिक्षिका डॉ निशात शेख, डॉ. शबनम खानूनी, डॉ. हिमांशू साखरे, डॉ. सबा खान, सर्व परिचारिका, एएनएम, ब्लॉक फॅसिलिटेटर तसेच शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी कुटुंब नियोजनाचा संदेश प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमाच्या शेवटी नागरिकांना “लहान कुटुंब – सुखी कुटुंब” तसेच “दोन जन्मांमध्ये योग्य अंतर – कुटुंब सुदृढ निरंतर” हा संदेश देत शासनाच्या कुटुंब नियोजन सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

Popular Articles