spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना लवकरच थकीत देयके; सफाई कर्मचाऱ्यांच्या घरकुलासह विविध मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही

कामठी :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘सेवा गौरव दिन’ कार्यक्रमाच्या निमंत्रणासाठी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेरसिंग सतीश डागोर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ सामाजिक नेते रूपलाल समुद्ररे यांच्या प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा मंत्री दिनेश बिल्लरवान यांनी नगर परिषद कामठीचे नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण पत्रिका सुपूर्द केली.

यावेळी युनियनचे महासचिव कृष्णा राणे यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसह नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत देयकांचा मुद्दा नगराध्यक्षांसमोर मांडला. त्यावर नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांनी नगर परिषदेतून सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांची थकीत देयके लवकरात लवकर अदा करण्यासाठी प्रशासन स्तरावर कार्यवाही सुरू असून, लवकरच त्यांना त्यांचा हक्काचा निधी मिळेल, असे आश्वासन दिले.

युनियनचे अध्यक्ष दिनेश बिल्लरवान यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम सफल्य योजनेअंतर्गत पात्र सफाई कर्मचाऱ्यांना घरकुलाचा लाभ देण्याची मागणी केली. यावर नगराध्यक्षांनी संबंधित प्रस्तावावर कार्यवाही सुरू झाल्याचे सांगत सकारात्मक प्रतिसाद दिला.

बैठकीदरम्यान सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या, कल्याणकारी योजना आणि कामकाजाशी संबंधित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांनी, “माझ्या कार्यकाळात नगर परिषदेच्या कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याचे हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे स्पष्ट आश्वासन दिले.

नगराध्यक्षांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल युनियनचे अध्यक्ष दिनेश बिल्लरवान यांनी त्यांचे आभार मानले.

यावेळी युनियनचे सचिव कैलाश मलिक, नरेश कलसे, नरेश वासनिक, शेखर बर्मन, अमित मधुमटके, पुरुषोत्तम समुद्ररे, राजू हाटे, शरद उज्जैनवार, राजेश नाहरकर तसेच युनियनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles