– पदग्रहण सोहळ्यात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र; सामाजिक न्यायासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन
नागपूर :- आजाद समाज पार्टी (कांशीराम) च्या दक्षिण नागपूर विधानसभा कार्यकारिणीची घोषणा व पदग्रहण सोहळा रविवारी २७ सप्टेंबर रोजी दक्षिण नागपुरातील गृहलक्ष्मी सभागृह येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला पक्षाचे नागपूर जिल्हाध्यक्ष ओपूल तामगाडगे, जिल्हा उपाध्यक्ष आशिष निस्वादे, जिल्हा सचिव विशाल बनसोड, जिल्हा सचिव रोशन ठवरे, जिल्हा सचिव सूरज पुराणिक तसेच दक्षिण-पश्चिम विधानसभा अध्यक्ष बादल बनसोड यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी दक्षिण नागपूर विधानसभा कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. तसेच दीक्षा चवरे यांची नागपूर जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुखपदी आणि संदीप भोंगाडे यांची जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष ओपूल तामगाडगे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना तामगाडगे यांनी फुले, शाहू, आंबेडकर आणि मान्यवर कांशीराम यांच्या विचारांची चळवळ गतिमान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी संघटितपणे काम करण्याचे आवाहन केले. तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात आंदोलनात्मक व संघटनात्मक कार्य अधिक मजबूत करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले. दलित, शोषित, पीडित, हातमजूर व कामगार तसेच विद्यार्थीवर्गाच्या विविध प्रश्नांसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने आवाज उठवावा. समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटित प्रयत्न करावेत आणि पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवावी, असे आवाहन तामगाडगे यांनी अध्यक्षीय भाषणातून केले. दक्षिण नागपूर विधानसभा कार्यकारिणी
बाळा पाटील– अध्यक्ष, दक्षिण नागपूर विधानसभा
शशांक भोयर– उपाध्यक्ष
अमन गणवीर– प्रभारी
आतीश कंगाली– प्रभारी
सानी शेख– महासचिव
स्वप्नील दलाल– सचिव
ललित बाचलकर– एम.एन.सी. संघटन सचिव
छाया गिरडे–दक्षिण नागपूर विधानसभा महिला अध्यक्ष
सरांश शिवहरे– सोशल मीडिया इन्फॉर्मर
जागेश्वर वऱ्हाडे– संघटन प्रमुख
सचिन जयस्वाल– कोषाध्यक्ष
निखिल कुंटे– विधानसभा संघटन सचिव यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा सचिव सूरज पुराणिक यांनी केले, तर दक्षिण नागपूर विधानसभा अध्यक्ष बाळा पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे पक्षाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. आगामी काळात दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात संघटनात्मक विस्तार, सामाजिक प्रश्नांवरील आंदोलन आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.



